Tamil Nadu school bus train accident  Saam TV News Marathi
देश विदेश

भयंकर! रेल्वेची स्कूल बसला जबर धडक, ३ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Tamil Nadu Train Accident : तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात ट्रेनने स्कूल बसला धडक दिली. या भीषण अपघातात ३ चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी आहेत.

Namdeo Kumbhar

Tamil Nadu school bus train accident : तामिळनाडूमधून अपघाताची एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कडलूर जिल्ह्यामध्ये रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनने स्कूल बसला जोरात धडक दिली. या अपघातात तीन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रथामिक तपासातून समोर आले आहे. अपघातानंतर लोकांचा राग अनावर आला अन् मोर्चा काढण्यात आला. रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा कमी असल्यामुळे हा अपघात झाल्याचा पालकांनी आरोप केला आहे. या घटनेचा तपास रेल्वे आणि स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत आहे. (School children dead in train accident)

तामिळनाडूमधील कडलूर जिल्ह्यातील चेम्मनकुप्पम परिसरात आज सकाळी हा दुर्दैवी अपघात झालाय. वेगात असेल्या ट्रेनने स्कूल बसला जोरात धडक दिली. रेल्वे फाटक नाही, त्यात सुरक्षा रक्षकही नव्हते, बस चालकाने निष्काळजीपणा करत वेगात रेल्वे रूळ पार करण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे अतिशय वेगात होती, त्यामुळे हा अपघात झालेला असू शकतो, असे स्थानिकांनी सांगितलेय. या भयंकर अपघातामध्ये तीन निरागस मुलांचा मृत्यू झाला आहे. १० मुले आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत, जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृताची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वेने इतक्या जोरात धक्का दिला की स्कूल बस ५० ते ७० मीटरपर्यंत घासत गेल्याचे प्रथमदर्शीने सांगितले. ट्रेनची धडक इतकी जोरात होती, की व्हॅनचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही मुलांची प्रकृती गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात

स्थानिक लोक आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा अपघात स्कूल बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला. चालकाने रेल्वे दिसूनही घाईघाईने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि जिल्हा प्रशासनाने अपघाताच्या तपासाला सुरुवात केली आहे. दुर्दैवी अपघाताची बातमी पसरताच परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण पसरले. स्थानिक लोक घटनास्थळी जमले आणि रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या कमतरतेबद्दल नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १५ दिवस प्रतिबंधात्मक आदेश; ५ पेक्षा जास्त लोकही जमू शकत नाहीत! नेमकी कशावर घातलीय बंदी?

Accident : महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Ear Wax: कानातला मळ काढण्यासाठी माचिसची काडी वापरताय? आजच सवय सोडा, अन्यथा...

Nutmeg Milk: रात्री झोप येत नसेल तर? दुधात मिसळा स्वयंपाकघरातील हा पदार्थ

Mumbai : ९ जुलैला भारत बंद! मुंबईत शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार? काय सुरु असणार?

SCROLL FOR NEXT