Atal Setu : जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरून उडी, नवी मुंबईत खळबळ

JJ Hospital doctor missing news : जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टर डॉ. ओंकार कवितके यांनी अटल सेतूवरून खाडीत उडी मारली. बचावकार्य सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Atal Setu Navi Mumbai Latest News Update
Atal Setu Navi Mumbai Latest News Update
Published On

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Atal Setu Navi Mumbai Latest News Update : जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टराने सोमवारी रात्री अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी घेऊन आयुष्य संपवण्याच प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९:४३ वाजता ही घडला घडली. एका ३२ वर्षीय डॉक्टरने खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित इसमाची ओळख डॉ. ओंकार भागवत कवितके (वय ३२, व्यवसाय: डॉक्टर, जे. जे. हॉस्पिटल, राहणार: अविनाश सोसायटी, कळंबोली) अशी झाली आहे.

एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती अटल सेतू नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिस आणि बीट मार्शल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील ११.८०० किमी बिंदूवर त्यांना डॉ. कवितके यांची होंडा अमेझ कार (MH ४६ CM ६८३७) आणि एक iPhone आढळला. मोबाईलवरील संपर्कांद्वारे त्यांची ओळख पटली. डॉ. कवितके यांची बहीण कोमल प्रमोद लंबाते यांनी नातेवाइकांसह कळंबोली पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे.

Atal Setu Navi Mumbai Latest News Update
Mira Bhayandar : मोठी बातमी! मनसेच्या अविनाश जाधवांना पहाटे पोलिसांनी घेतलं ताब्यात, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी कारवाई

या घटनेनंतर सागरी सुरक्षा विभागाची 'ध्रुवतारा' बोट, रेस्क्यू टीम आणि अॅम्बुलन्सच्या सहाय्याने खाडीत शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. अद्याप डॉ. कवितके यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणी काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

Atal Setu Navi Mumbai Latest News Update
गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला परवानगी, मराठी लोकांना का नाही? मनसेचा सरकारला संतप्त सवाल, मीरा भाईंदरचे वातावरण तापलं

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अटल सेतूसारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशा घटना घडणे चिंताजनक आहे. पोलिस आणि बचाव पथक युद्धपातळीवर शोधकार्य करत असून, लवकरच याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. ३२ वर्षीय डॉक्टरने उडी का मारली? याबाबतचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Atal Setu Navi Mumbai Latest News Update
Prithvi Shaw : अखेर पृथ्वी शॉचा संघ ठरला, ऋतुराजसोबत सलामीला उतरणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com