Odisha Shocking Video Saam Tv
देश विदेश

Shocking: प्रेमविवाहाची भयंकर शिक्षा! जोडप्याला नांगराला बांधून शेतात फिरवलं,धक्कादायक VIDEO

Odisha Shocking Video: ओडिशामध्ये एका जोडप्याला प्रेमविवाहाची तालिबानी शिक्षा मिळाली. या जोडप्याला गावकऱ्यांनी नांगराला बांधून शेत नागरले त्यानंतर त्यांचे शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

ओडिशाच्या रायगड जिल्ह्यात एक अमानुष घटना समोर आली आहे. कंजामाझीरा गावामध्ये सामुदायिक परंपरेविरोधात लग्न करणं तरुण-तरुणीला खूपच महागात पडले. या नवविवाहीत जोडप्याला संतप्त झालेल्या समाजाने तालिबानी शिक्षा दिली. शुद्धीकरणाच्या नावाखाली संतप्त गावकऱ्यांनी जोडप्याला बैलासारखे नांगराला बांधले आणि नंतर त्यांना शेत नांगरण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा निषेध करत स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणसिंगपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कंजामाजोडी गावात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. सामुदायिक रिती-रिवाजाला डावलून एका तरुण-तरुणीने लग्न केले होते. पीडित तरुण हा तरुणीच्या मावशीचा मुलगा आहे. नात्यानुसार या दोघांचे लग्न होऊ शकत नव्हते. पण त्यांनी रितीरिवाजांना झुगारून लग्न केले. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. गावकऱ्यांच्या दृष्टीने हा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांनी या जोडप्याला अमानवीय शिक्षा दिली.

गावकऱ्यांनी या जोडप्याला नांगराला बैलांना जसं बांधतात तशा पद्धतीने बांधले. त्यानंतर त्यांच्याकडून संपूर्ण शेत नांगरून घेतलं. ही संपूर्ण घटना गावकरी पाहत होते. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, या जोडप्याला बांबू आणि लाकडापासून तयार करण्यात आलेल्या नांगराला पुढे दोरीच्या सहाय्याने बांधले. त्यानंतर त्यांना गुडघ्यावर बसवून शेत नांगरायला भाग पाडल्याचे दिसत आहे.

संपूर्ण गाव हा तमाशा पाहत होते. पण कुणीही त्यांना थांबवले नाही. शुद्धीकरणाच्या नावाखाली या जोडप्याला ही शिक्षा देण्यात आली. या अपमानस्पद आणि अमानुष शिक्षेनंतर या दोघांना गावातील मंदिरात नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा शुद्धीकरण विधी करण्यात आला. गावकऱ्यांच्या मते या जोडप्याला त्यांनी अपवित्र विवाहापासून शुद्ध केले. इतकेच नाही तर असाही गावकऱ्यांनी दावा केला की, जर हा विधी केला नसता तर गावकऱ्यांचे पीक गेले असते. गावकऱ्यांनी या जोडप्याला दिलेल्या शिक्षेला नेटकरी तालिबानी शिक्षा असल्याचे म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, मोठा नेता उपमुख्यमंत्र्यांच्या गटात जाण्याच्या तयारीत

'तू खूप क्यूट आहेस' म्हणाला अन्...; स्कूल बसचालकाचं 9 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य|VIDEO

Chanakya Niti : चाणक्यांच्या या ३ गोष्टी समजून घ्या, संसार कधीच मोडणार नाही

Pune Airport : बँकॉक वरून आलेल्या प्रवासीकडून ६ कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: मीरा रोडच्या केम छो बारवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT