धक्कादायक! आनंदात तालिबान्यांचा गोळीबार; लहान मुलांसह अनेक लोक ठार Twitter
देश विदेश

धक्कादायक! आनंदात तालिबान्यांचा गोळीबार; लहान मुलांसह अनेक लोक ठार

तालिबानने पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवत नॅशनल रेझिस्टन्स प्रंट ऑफ अफगाणिस्तानचा पराभव केल्याचा दावा केल्यावर काबुलमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला.

वृत्तसंस्था

काबूल: मागच्या पंधरा दिवसांपुर्वी तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानला (Afganistan) पुर्ण स्वातंत्र्य मिळालेला देश घोषित केले. २० वर्षे चाललेल्या प्रदिर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने (USA) अफगाणिस्तानतून आपले सैन्य माघारी घेतले. अमेरिकेन सैन्याच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तानमधून उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी आनंद व्यक्त करत हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर पुन्हा काबुलमध्ये शुक्रवारी रात्री तालिबान्यांनी गोळीबार केल्यामुळे अनेक लहान मुलांसह लोक ठार झाले असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे.

तालिबानने पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवत नॅशनल रेझिस्टन्स प्रंट ऑफ अफगाणिस्तानचा पराभव केल्याचा दावा केल्यावर काबुलमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात लहान मुलांसह अनेक लोक ठार झाले असल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्था अस्वाकाने दिली आहे. सोशियल मीडियावर फोटो आणि व्हिडोओ व्हायरल झाले आहेत.

''सर्वशक्तीमान अल्लाहच्या कृपेने, संपुर्ण अफगाणिस्तानवर आमचे नियंत्रण आहे. विरोधी दलाचा पराभव झाला आहे. आणि पंजशीर आता आमच्या अधिपत्याखाली आहे.'' असे वृत्त रॅायटर्सने तालिबानच्या कमांडोच्या हवाल्याने दिले होते. मात्र पंजशीरचे नेते अहमद मसूद यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले '' पंजशीर विजयाची बातमी खोटी आहे. पाकिस्तानी माध्यमांवर पंजशीर जिंकल्याच्या बातम्या फिरत आहेत. हे खोटे आहे. पंजशीरवर विजय मिळवणे हा माझा शेवटचा विजय असणार असेल, इंशाअल्लाह'' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT