तालिबानने मुलींची मागविली यादी, महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता! Saam Tv
देश विदेश

तालिबानने मुलींची मागविली यादी, महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता!

तालिबानची राजवट येऊ लागल्याने तेथील नागरिकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर तुफान गर्दी केली होती. यावेळी झालेल्या फायरिंगमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या पलीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणी संकटात सापडल्या आहेत.

वृत्तसंस्था

अफगानिस्तानातून Afghanistan राष्ट्राध्यक्ष गनी यांनी पलायन केले. त्यामुळे आता तालिबानचेच Taliban एकहाती वर्चस्व राहण्याची चिन्हे दिसत आहेत. अफगाणिस्तान मध्ये पुन्हा तालिबानची राजवट येऊ लागल्याने तेथील नागरिकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर तुफान गर्दी केली होती. यावेळी झालेल्या फायरिंगमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या पलीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणी संकटात सापडल्या आहेत.

हे देखील पहा-

तालिबानने काही दिवसांपूर्वी, त्यांनी ताब्यात घेतलेल्या क्षेत्रातील सर्व मौलवींना 15 वर्षांवरील मुली आणि 45 वर्षांखालील विधवांची यादी तालिबानकडे सोपवण्यास सांगितले आहे. एका वेबसाइटच्या अहवालानुसार, 'तालिबानी लोक घरोघरी जाऊन मुली शोधत आहेत आणि त्यांना लैंगिक गुलाम बनवले जात आहे.

वृत्तानुसार, तालिबानचे नेते आता अफगाण मुलींचे अपहरण करून त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करून त्यांना लैंगिक गुलाम बनवण्याचे कामही करत आहेत. तालिबानची ही कारवाई इराक आणि सीरियामधील इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखीच आहे, जे महिलांना लैंगिक गुलाम बनवण्यासाठी कुख्यात आहेत.

या यादीतील मुलींना तालिबानच्या दहशतवाद्यांशी लग्न करावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालिबानने आंतरराष्ट्रीय दबाव कमी होताच हिंसा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अफगानिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण आहे हे दिसून येत आहे. तालिबान कडून १५ वर्षंखालील तरुणी आणि विधवा महिला यांची यादी मागविली होती. यावर अद्याप पुढील माहिती उपलब्ध झालेली नाही. माहितीनुसार, जबरदस्तीने महिलांशी लग्न लावले गेले तर या महिलांना पाकिस्तानमध्ये Pakistan नेले जाईल आणि पुन्हा त्यांना प्रशिक्षण देऊन इस्लाममध्ये परावर्तित केले जाईल.

1996 मध्ये तालिबानने महिलांचे शिक्षण, रोजगार आदीपासून दुर ठेवले होते तसेच त्यांना बुरखा वापरण्यासही बंधनकारक करण्यात आले होते. बाजारात पुरुषांशिवाय जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती. तालिबानही तसेच काहीसे क्रूर निर्णय घेऊ शकते. तसेच काहीसे संकेत दिसत असून महिलांना गेल्या 20 वर्षांत मिळालेले स्वातंत्र्य एका रात्रीत पारतंत्र्यात जाते का अशी भीती निर्माण झाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT