दिलासादायक! लातूर जिल्ह्यातील 'हे' गाव कोरोनामुक्त

गावात एकूण 43 रुग्ण आढळल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती.
दिलासादायक! लातूर जिल्ह्यातील 'हे' गाव कोरोनामुक्त
दिलासादायक! लातूर जिल्ह्यातील 'हे' गाव कोरोनामुक्तदीपक क्षीरसागर
Published On

दीपक क्षीरसागर

लातूर : कोरोनाची Corona दुसरी लाट संपत असतानाच लातूर Latur जिल्ह्यातील औसा तालुक्यातील या गावात एकूण 43 रुग्ण आढळल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना या गावात मात्र दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत होती. ही रुग्ण संख्या 43 वर पोहोचले गाव गावकरी, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन एकदम खडबडून जागं झाले होते. आता सध्या याच गावाने विविध उपाययोजना करत हे गाव कोरोना मुक्त केलं आहे. या गावाचे नाव आहे 'माळुंब्रा'. Malumbra gaon Corona Free

हे देखील पहा -

मागच्या महिन्यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा Ausa तालुक्यातील माळुंब्रा गावात पिक विमा भरण व बाजारात खरेदी करण्यासाठी माळुंब्रा येथील काही गावकरी आले असता, त्यापैकी एकाला लागण झाली दिवसेंदिवस गावात कोरोना रुग्ण आढळू लागले. यामुळे आरोग्य प्रशासनासह महसूल प्रशासन यांची देखील चिंता वाढली. ही संख्या 43 वर जाऊन पोहचली. जवळपास सहाशे लोकवस्ती असलेल्या गावात 43 कोरोना रुग्ण आढळल्याने गावकरी देखील धास्तावले होते.

या सर्व रुग्णांना लातूर येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल करून उपचार सुरू केले. तर गाव पातळीवर बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय पदक तैनात करण्यात आले. त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांची कोरोना चाचणी करत लोकांचे लसीकरण केले. तर गाव पातळीवर ग्रामपंचायत व महसूल विभाग यांच्या वतीने ग्रामसेवक बी एस पाटील व तलाठी यांनी सदर गाव कंटेनमेंट झोन तयार केला.

दिलासादायक! लातूर जिल्ह्यातील 'हे' गाव कोरोनामुक्त
मुलांच्या शिक्षणासाठी मुख्याध्यापकांचा अनोखा उपक्रम...

गावातील प्रत्येकाने घेतली अशी काळजी;

गावामध्ये बाहेरच्या व्यक्तीला येण्यास बंदी घालण्यात आली. तर गावातील व्यक्तीला गावाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली. प्रत्येक घराघरात सॅनी टायझर, मास्क तर प्रत्येक व्यक्तीत सोशल डिस्टन्स यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. या काळामध्ये नागरिकांनी सकस व पौष्टिक आहार कोणता व कसा घ्यावा याच मार्गदर्शन आणि प्रचार आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला. यामुळे गावात घुसलेल्या कोरोनाला माळुंब्रा करांनी गावच्या वेशीवरच रोखलं. काल 43 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सर्वच रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आता माळुंब्राकरांनी गावामध्ये मास्क, टायझर व सोशल डिस्टन्स हे काटेकोरपणे पालन करण्याचा ठरवले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com