Pakistan Attack News Saam Tv
देश विदेश

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

Pakistan Taliban Attack : तालिबानकडून पाकिस्तानवर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तान सैन्याचे लेफ्टनंट कर्नल, मेजरसह ११ सैनिक ठार झाले आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Alisha Khedekar

  • पाकिस्तानवर तालिबानकडून मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आलं आहे

  • या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल आणि मेजरसह ११ सैनिक ठार झाले आहेत

  • या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे

  • तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे . पाकिस्तानी सैन्यावर आज मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल आणि मेजरसह ११ सैनिक ठार झाले. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानकडून आज पाकिस्तानवर भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. खैबर पख्तूनख्वाच्या ओरकझाई प्रांतात हा हल्ला झाला. पाकिस्तान तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. बलुच बंडखोरांच्या हल्ल्यांच्या मालिकेदरम्यान हा रक्तपात झाला आहे. पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे की ओरकझाई प्रांतात गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाईदरम्यान हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये एक अधिकारी आणि एक सैनिक ठार झाला. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पाकिस्तानी लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, खैबर पख्तूनख्वा येथे सुरक्षा दलांनी कारवाई केली आणि त्यात १९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले. या कारवाईचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट कर्नल जुनैद आरिफ (३९) आणि मेजर तय्यब राहत (३३) हे त्यांच्या नऊ साथीदारांसह ठार झाले. नायब सुभेदार आझम गुल (३८), नाईक आदिल हुसेन (३५), नाईक गुल अमीर (३४), लान्स नाईक शेर खान (३१), लान्स नाईक तलिश फराज (३२), लान्स नाईक इर्शाद हुसेन (३२), शिपाई तुफैल खान (२८), शिपाई आकिब अली (२३), शिपाई आकिब अली (२३) अशी शहीद जवानांची नावे आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (ISPR) सांगितले की, या भागात उरलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी 'सॅनीटाइजेशन ऑपरेशन' सुरू आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, दहशतवाद पूर्णपणे संपेपर्यंत ही मोहीम सुरू राहील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आमच्या शूर सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही." दरम्यान या घटनेनंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT