अफगाणिस्तानमधील (Afganistan) संघर्ष गेल्या कित्येक दिवसापासून सुरु आहे. तालीबानने (Taliban) अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) म्हणाले की, अफगाणिस्तानातील सैन्य 31 ऑगस्टपर्यंत माघारी घेण्यात येणार होते. परंतू अजून थोडे दिवस सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात करण्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता प्रकरण अधिक तापलेले दिसत आहे.
स्थानिक माध्यमांनुसार, तालिबानने अमेरिकेला स्पष्टपणे धमकी दिली आहे. तालिबानचे प्रवक्ते सोहेल शाहीन यांनी एक निवेदन जारी करून म्हटले जर अमेरिकेने आपले सैन्य मागे घेण्यास विलंब केला तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील. जर अमेरिकेने 31 ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी नाही घेतले तर त्याचे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार व्हाईट हाऊसमध्ये रविवारी दुपारी पत्रकारांना संबोधित करताना बायडन यांनी सैन्य मागे घेण्याच्या मोहिमेबाबत माहिती दिली. बायडन यांना 31 ऑगस्टची मुदत जवळ आल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "आमच्यात आणि लष्करामध्ये चर्चा सुरू आहे, आशा आहे की आम्हाला मुदतवाढ करावी लागणार नाही." ते पुढे म्हणाले याबाबत अजून कुठलिही स्पष्टता नाही आमची फक्त चर्चा सुरु आहे. सैन्य मागे घेण्याबाबतचा निर्णय अजून खूप दूर असल्याचेही बायडन यांनी सांगितले.
जुलैमध्ये बायडन यांनी अमेरिकन लष्कराला या महिन्याच्या अखेरीस अफगाणिस्तानमधील मिशन संपवण्याचे आदेश दिले होते. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केल्यापासून अमेरिका अमेरिकन नागरिकांना आणि अफगाणिस्तानच्या मित्रांना देशाबाहेर काढण्यासाठी हातपाय मारत आहे. बायडन म्हणाले, ''अमेरिकन सैन्याने गेल्या 24 तासांमध्ये अफगाणिस्तानातून सुमारे 3,900 लोकांना बाहेर काढले आहे आणि 14 ऑगस्टपासून अमेरिका आणि युतीच्या विमानांनी सुमारे 28,000 लोकांना बाहेर काढले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.