Tahir Hussain sentenced to life imprisonment by Karkardooma Court in Ankit Sharma murder case linked to 2020 Delhi riots. saam tv
देश विदेश

सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाला जन्मठेप; कोर्टाचा निकाल

Tahir Hussain life imprisonment in Ankit Sharma Killed Case Details: दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कडकडडूमा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.

Omkar Sonawane

दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांना जन्मेठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये दिल्लीच्या उत्तर-पूर्वच्या दिल्लीतील दंगलीदरम्यान गुप्तचर विभागाच्या अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने ताहिर हुसेन यांना दोषी ठरवले होते. शिक्षा सुनावल्यानंतर सर्व दोषीनी एकच हंबरडा फोडला, तर कोर्टाबाहेर त्यांच्या कुटुंबियांचाही आक्रोश पाहायला मिळाला. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोषीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

कोर्टाने 13 जुलैला ताहिर हुसेन, नाझिम, काशिम ,अनस आणि जावेद यांना हत्या, अपहरण, दंगल करण्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. तर 11 आरोपांपैकी 6 जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही केस दयालपूर पोलिस ठाण्यात अंकित शर्मा यांचे वडील रविंदर कुमार यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आली होती. 25 फेब्रुवारी 2020 रोजी अंकित शर्मा ऑफिसमधून घरी आल्यानंतर पुन्हा बाहेर गेले मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाही.

यानंतर कुटुंबीय त्यांचा शोध घेत असताना काही लोकांनी त्यांची हत्या करून मृतदेह चांदबाग पुलाजवळील खजुरी खास नाल्यात फेकल्याची माहिती दिली, दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी नाल्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. रवींदर कुमार यांनी थेट आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन आणि त्यांच्या सहकऱ्यांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाने ताहिर हुसेन यांना निलंबित केले होते, 24 मार्च 2023 रोजी कोर्टाने ताहिर हुसेनसह 11 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले होते.

23 फेब्रुवारी 2020 रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विरोधक आणि समर्थक आमनेसामने आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली आणि परिस्थिती चिघळली. 26 फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला तर 250 हून अधिक जखमी झाले. मृतांमध्ये 38 मुस्लिम आणि 15 हिंदूंचा समावेश होता. सुमारे 800 दुकाने जाळण्यात आली, तर 500 हून अधिक घरे जाळली गेली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

Omar Abdullah: मुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, ३२ वर्षांच्या संसारानंतर वेगळे झाले

Beauty Tips : स्किनटोननुसार लिपस्टिकची निवड कशी करावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

SCROLL FOR NEXT