नवीन वर्षात झोमॅटो, स्विगी वरील खाद्यपदार्थांसाठी द्यावे लागणार जास्तीचे पैसे... SaamTV
देश विदेश

नवीन वर्षात झोमॅटो, स्विगी वरील खाद्यपदार्थांसाठी द्यावे लागणार जास्तीचे पैसे...

Zomato आणि Swiggy यांसारख्या खाद्यपदार्थ डिलिव्हरी अॅपवरती 5 टक्के कर लावला असून हा नवीन नियम नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : तुम्ही जर Online जेवण ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण जे लोक झोमॅटो (Zomato) स्विगी Swiggy य अॅपद्वारे जेवन किंवा अन्य खाद्यपदार्थ मागवतात त्यांच्यासाठी तशी ही आंनंदाची नाही मात्र गरजेची बातमी आहे. हो कारण आता केंद्र सरकारने Zomato आणि Swiggy यांसारख्या खाद्यपदार्थ डिलिव्हरी अॅपवरती 5 टक्के कर लावला असून हा नवीन नियम नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. (Swiggy, Zomato to collect 5% GST from customers from January 1)

हे देखील पहा -

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार या Food App कंपन्यांना रेस्टॉरंटप्रमाणे Input Tax क्रेडिटचा लाभ मिळणार नाहीये, गेल्या अनेक दिवसांपासून फूड डिलिव्हरी अॅपच्या सेवांना GST च्या कक्षेत आणण्याची मागणी सुरु होती. GST कौन्सिलच्या 17 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली होती.

1 जानेवारी 2022 पासून देशभरात हे नवे नियम लागू होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या संदर्भात बैठक झाली होती. या बैठकीनंतर निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. दरम्यान, GST कौन्सिलने COWID-19 औषधांवरील सवलतीच्या कर दरांमध्ये देखील वाढ केली आहे.

तसंच या विविध अँपवरुन ऑर्डर केल्यास जो 5 टक्के कर द्यावा लागणार आहे त्याचा भार थेट ग्राहकांवरती पडणार नसल्याचीही माहिती मिळतं आहे. सरकार अन्न वितरण करणाऱ्या अॅप्सकडून हा कर वसूल करेल. पण फूड डिलिव्हरी अॅप्स ग्राहकांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात 5 टक्के कर वसूल करतील अशीच शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT