ST Big Breaking : संप आम्हीच सुरु केला; आम्हीच बंद करत आहोत - अजय गुजर

'ST कर्मचारी भावनाविवश होत आहेत, पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही कोणाकडून पैस घेतले नाही, कोणी जमा केले आम्हाला ठाऊक नाही.'
ST Big Breaking : संप आम्हीच सुरु केला; आम्हीच बंद करत आहोत - अजय गुजर
ST Big Breaking : संप आम्हीच सुरु केला; आम्हीच बंद करत आहोत - अजय गुजर

मुंबई : अजय गुजर (Ajay Gujar) ST संपाची नोटीस देणारे तसेच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी ST कर्मचारी या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आज परीवहन मंत्री अनिल परब यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आणि अनिल परब (Anil Parab) यांच्या सोबत ते पत्रकार परीषदेत सामिल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपणच संप सुरु केला आणि तो आता मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

ST Big Breaking : संप आम्हीच सुरु केला; आम्हीच बंद करत आहोत - अजय गुजर
Breaking : त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मान्य करु संप मागे घ्या; अनिल परबांचे आवाहन

पत्रकार परीषदेत ते म्हणाले, ' 21 ऑक्टोबर रोजी संघटनेने दिलेल्या नोटीस नुसार 3 नोव्हेंबरच्या मध्य रात्री पासून कनिष्ठ एसटी कर्मचारी वेतन श्रेणी संघटनेने संप पुकारला एवढे दिवस संप सुरू आहे. 2 ते 3 वेळेस परिवहन मंत्र्यांसोबत बैठका झाल्या काल शरद पवार (Sharad Pawar) साहेबांशी नवी दिल्लीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली तेव्हा विलीनीकरणाबाबत त्यांनी मान्य करण्याचं ठरवलं विलीनीकरण करावं ही आमची प्रमुख मागणी आहे , आम्ही त्यावर ठाम असल्याचही अजय गुजर यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, 'गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला लढा न्यायालयात प्रलंबित आहे. 20 जानेवारी 2022 समितीची मुदत तारीख आहे. न्यायालयात आज प्राथमिक अहवाल सादर झाला आहे 22 जानेवारीला समितीचा पूर्ण अहवाल येईल आज आम्ही मंत्र्यांची भेट मागितली होती त्यानुसार 2 वाजल्यापासून आता पर्यंत चर्चा झाली विलीनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय येईल तो आम्हा दोघांना मान्य असल्याचही गुजर म्हणाले.

पगारवाढ वेतनश्रेणी चुकीची आहे याबाबत आम्ही सांगितलं, त्यावर सुधारणा करण्याचा चर्चा करून विचार करण्याच महामंडळाने सांगतील आहे. दरम्यान जे 54 आत्महत्या केलेलं कर्मचारी आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी महामंडळ लवकर निर्णय घेईल, आर्थिक मदत 50 लाख आणि कुटुंबियातील व्यक्तीला तात्काळ नोकरीची आम्ही मागणी केली असल्याच गुजर यांनी सांगितलं.

हे देखील पहा -

दरम्यान राज्यात 306 ST कर्मचारी (ST Employee) करोना काळात मृत्युमुखी पडले त्यांना अद्याप आर्थिक अनुदान मिळालेलं नाही. त्यावर लवकरच निर्णय व्हावा, संपकऱ्यांवरती जी कारवाई झालीय ती मागे घ्यावी. मंत्र्यांनी ते मान्य केलं आहे ते लेखी आश्वासन आम्हाला दिलं असल्याचही त्यांनी सांगितंल. आम्ही ST संप (ST Strike) पुकारला होता, तो आज झालेल्या बैठकी नंतर आम्ही मागे घेत आहोत. विलीनीकरणा न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल.

राज्यभरातील कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेल्या लढा चर्चा केल्या प्रमाणे आता थांबवून, दिनांक 22 डिसेंबर पर्यंत कामावर हजर व्हावे, संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी ST कर्मचारी संघटनेने दिली होती. आणि आम्ही हीच संघटना हा संप मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचही त्यांनी यावेळी सांगितल.

ST Big Breaking : संप आम्हीच सुरु केला; आम्हीच बंद करत आहोत - अजय गुजर
Breaking : TET परीक्षेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

कर्मचारी भावनाविवश होत आहेत, पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही कोणाकडून पैस घेतले नाही, कोणी जमा केले आम्हाला ठाऊक नाही. आमच्यात आणि गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) कोणतीही फूट पडलेली नाही आम्हाला सदावर्ते न्याय देतील, अशी आम्हाला खात्री आहे. आता चर्चा करण्याची तयारी नाही, आम्ही संप मागे घेतला आहे. आम्ही पुकारलेल्या संप मागे घेतला. आम्हाला आंदोलन हायजॅक करण्याची भीती नाही. दरम्यान आता आजाद मैदानात (Azad Maidan) जाऊन आम्ही कर्मचाऱ्यांना ही भूमिका सांगणार असल्याचही त्यांनी जाहीर केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com