Most diamonds set in one ring - 24,679 by SWA Diamonds (Capestone) 🇮🇳  instagram/@guinnessworldrecords/
देश विदेश

World Record : एका अंगठीत तब्बल २४ हजारांपेक्षा जास्त हिरे! गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Most diamonds set in one ring : हा एक जागतिक विश्वविक्रम असून गिनीज बुक ऑप वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

तिरुवनंतपुरम, केरळ: एका अंगठीत किती हिरे असू शकतात? असा प्रश्न विचारला तर बहुतांश लोकं १०,२०,३०... असंच उत्तर देतील. पण केरळच्या एका सराफानं एका अंगठीवर इतके हिरे जडवले आहेत की, जगाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. एसडब्ल्यूए डायमंड्सचे (SWA Diamonds) सराफ अब्दुल गफूर अनादियान यांनी एका अंगठीत सर्वाधिक म्हणजे तब्बल 24,679 हिरे जडवले आहेत. हा एक जागतिक विश्वविक्रम असून गिनीज बुक ऑप वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. (Most diamonds set in one ring News)

हे देखील पाहा -

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) ने जाहीर केले आहे की केरळमधील SWA डायमंड्सने एका अंगठीत सर्वाधिक हिरे सेट करण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या ब्लॉगमध्ये केरळच्या कराथोडेमध्ये ५ मे ला हा विश्वविक्रम केल्याचे सांगितले. मशरूम-थीम असलेल्या 'अमी' रिंगमध्ये तब्बल 24,679 नैसर्गिक हिरे होते. या अंगठीचे नामकरण ‘अमी’ असे केले गेले असून या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे अमरत्व. एसडब्ल्यूए डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल गफूर अनाडियान या विषयी बोलताना म्हणाले, मश्रूम म्हणजे अळंबीला ही एक प्रकारची श्रद्धांजली आहे. अळंबी हे अमरत्व, दीर्घायुष्याचे प्रतिक आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ने त्याच्या Instagram पेजवर एक व्हिडिओ देखील अपलोड केला आहे, ज्यामध्ये अंगठी आणि त्याबद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे. SWA डायमंड्सने त्यांच्या ब्रँडकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या कामासाठी व्याप्ती वाढवण्यासाठी रेकॉर्डब्रेक रिंग तयार केली आहे, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने म्हणाले. सुंदर अंगठी तयार करण्यासाठी दागिने बनवणाऱ्या कंपनीला तीन महिने लागले. यापूर्वीचा विक्रम मेरठ येथील ज्वेलर्स हर्षित बन्सलच्या नावावर होता, ज्यांनी १२,६३८ हिऱ्यांची अंगठी तयार केली होती.

ही अंगठी कशी तयार केली?

एसडब्ल्यूए डायमंड्सचे ही अंगठी कशी तयार केली याबाबत माहिती दिली आहे, कंपनीने सांगितलं की, "थ्रीडी प्रिंटिंगनंतर, द्रव स्वरुपातले सोने मोल्डमध्ये ओतले गेले, थंड केले गेले आणि एकूण 41 अद्वितीय मशरूम पाकळ्यांच्या आकारात दाखल केले गेले. बेस पूर्ण झाल्यावर, प्रत्येक हिरा काळजीपूर्वक मशरूमच्या पाकळ्यांच्या प्रत्येक बाजूला हाताने काळजीपुर्वक लावला गेला. यात सर्व नैसर्गिक हिरे वापरले होते," असं कंपनीने म्हटले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Skin Symptoms: लिव्हरमध्ये बिघाड झालाय कसं ओळखायचं? त्वचेवर दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; हार्वर्ड तज्ञांचा इशारा

Government Holiday: २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Veg kolhapuri Recipe: हॉटेलस्टाईल व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडणार, सोमवारी साधणार संवाद

Panipuri Puri Recipe : घरच्या घरी क्रिस्पी पानीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या? वापरा ही सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT