Surat Diamond Bourse Saam Digital
देश विदेश

Surat Diamond Bourse: पेंटागॉनपेक्षाही मोठं कार्यालय, १.५० लाख लोकांना रोजगार...., कसे आहे PM नरेंद्र मोदींनी गुजरातला भेट दिलेले 'सुरत डायमंड बोर्स'

Surat Diamond Bourse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरतमधील दोन मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं. त्यात 'सुरत डायमंड बोर्स'आणि सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचा समावेश आहे.

Sandeep Gawade

Surat Diamond Bourse

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरतमधील दोन मोठ्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं. त्यात 'सुरत डायमंड बोर्स'आणि सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचा समावेश आहे. तब्बल ४२०० हिरे आणि सोने व्यावसायिकांनी एकत्र येत 'सुरत डायमंड बोर्स' हा जागतिक दर्जाचा प्रकल्प साकारला आहे. तर १६० कोटी खर्च करून सुरत विमानतळाची टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे.

बहुचर्चित'सुरत डायमंड बोर्स' अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉन कार्यालयापेक्षाही मोठे आहेत. तसेच जगातील सर्वात मोठ्या हिरे आणि दागिन्यांच्या व्यापाराचे केंद्र बणणार आहे. तब्बल ४२०० हिरे आणि सोने व्यावसायिकांनी एकत्र येत जागतिक दर्जाचा हा प्रकल्प साकारला आहे. सुरत डायमंड बोर्स हे आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल.

'सुरत डायमंड बोर्स'ची इमारत ६७ लाख चौरस फूटपेक्षा जास्त क्षेत्रावर पसलेली आहे. सुरत शहरानजीक शजोद गावात या इमारतीची उभारणी करण्यात आली असून ही इमारत जगातील सर्वात मोठे ऑफीस कॉम्प्लेक्स ठरली आहे. कच्चे आणि पॉलिश्ड हिरे आणि दागिन्यांच्या व्यापाराचे ही इमारती जागतिक केंद्र बनेल. इमारतीत आयात निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, सुरक्षित तिजोरी आणि आतरराष्ट्रीय बँकिंगची सुविधा असणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT