नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. भटक्या कुत्र्यांनी पादचाऱ्यांना चावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नागरिकांना होणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. भटक्या कुत्र्यांना वाचवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने सोमवारी आठ आठवड्यात भटक्या कुत्र्यांना पकडून 'डॉग शेल्टर'मध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांवर कारवाई करताना कोणती संस्था किंवा व्यक्तीने अडथळा घालणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, 'भटक्या कुत्र्यांना चावा घेतल्याचा घटना वाढल्याने कोर्टाने कारवाईचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश जेबी पारदीवाला आणि न्यायाधीश आर महादेवन यांच्या पीठाने हे आदेश दिले आहेत. दिल्लीत साधारण ५०००० भटक्या कुत्र्यांना निवारा बनवण्याचे आदेश दिले आहेत'.
भटक्या कुत्र्यांची नसबंधी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली पाहिजे. भटक्या कुत्र्यांना विशेष निवाऱ्यामध्ये ठेवलं पाहिजे. भटक्या कुत्र्यांना रस्ते, गल्ली आणि कॉलनीत सोड नये, असेही कोर्टाने म्हटलं.
सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांना एका आठवड्यात हेल्पलाइन जारी करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने दिल्ली सरकार आणि पालिकेला दिल्लीतील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले आणि छोट्या कुत्र्यांना दुखापत होऊ नये, याची काळजी घेण्याचेही आदेश दिले आहेत.
भटक्या कुत्र्यांना पकडताना कोणी अडथळा घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. या व्यक्ती किंवा संस्थांवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात रेबीज होऊन मृत्यू झालेल्या लोकांना पुन्हा जिंवत करू शकतो का, असा सवालही कोर्टाने प्राणीमित्र, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना विचारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.