Rahul Gandhi saam tv
देश विदेश

Rahul Gandhi Gets Relief : राहुल गांधी पुन्हा संसदेत दिसणार, २०२४ ची निवडणूकही लढणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ काय?

Supreme Court Verdict on Rahul Gandhi : राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या जास्तीच्या शिक्षेवरही सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रविण वाकचौरे

Rahul Gandhi News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासाठी आज महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा दिवस आहे. 'मोदी आडनाव' यावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी सूरतच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सूरत न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली होती. राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा सूरत न्यायालयाच्या निकालाला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

 राहुल गांधींच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षेला स्थगिती दिली असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या जास्तीच्या शिक्षेवरही सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राहुल गांधी, काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या दृष्टीने अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

राहुल गांधी यांना सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ते लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले होते. लोकसभा सचिवालयाने एक आदेश जारी करून राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याच्या कारणावरून संसदेचे सदस्यत्व रद्द केले होते. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेसोबतच सुप्रीम कोर्टातनेही शिक्षेला स्थगिती दिली आहे.

खासदारकी पुन्हा मिळणार

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी पुन्हा संसदेत दिसू शकतात. राहुल यांचं लोकसभा सदस्यत्व पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर वायनाड जागेसाठी पोटनिवडणूक झाली असती तर त्यांचे सदस्यत्व कदाचित पुन्हा मिळू शकले नसते. वायनाडमध्ये अद्याप पोटनिवडणूक झालेली नाही.

खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना मिळालेलं सरकारी निवासही सोडावं लागलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा निवासस्थानही मिळणार आहे.

राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राहुल गांधींच्या २०२४ च्या निवडणुका न लढवण्याच्या शक्यताही दूर झाल्या आहेत. राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसती, तर त्यांच्या अडचणी वाढल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झाले की, राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा मिळणार. तसेच ते 2024 च्या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही ते दिसतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुजरात एटीएसची मोठी कारवाई; 500 किलो ड्रग्स जप्त, इरानी बोटीतून होत होती तस्करी

Dolly Chaiwala: भाजपच्या प्रचारात डॉली चायवाल्याची झापूक- झुपूक एन्ट्री; Photos पाहा

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

SCROLL FOR NEXT