Supreme Court  x
देश विदेश

Koregaon Bhima case: कोरेगाव भीमा प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, शोमा सेन यांना जामीन मंजूर

Shona Sen Bail In Supreme Court : पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या ६ मानवी हक्क कार्यकर्त्यांमध्ये सेन यांचा समावेश होता. त्या ६ जून २०१८ पासून सेन या अटकेत होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

Supreme Court Grant Bail To Shona Sen In Koregaon Bhima Case:

पुण्यातील एल्गार परिषदेनंतर कोरोगाव भीमा येथे भडकलेल्या हिंसाचार प्रकरणात शोमा सेन यांना अटक झाली होती. शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलाय. पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या ६ मानवी हक्क कार्यकर्त्यांमध्ये सेन यांचा समावेश होता. त्या ६ जून २०१८ पासून सेन या अटकेत होत्या. NIA ने यापूर्वी त्यांच्या जामिनाला विरोध केला होता, मात्र आता त्यांना न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचं NIA कडून सांगण्यात आले. (Latest News)

सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि नागपूर विद्यापीठातील माजी प्राध्यापिका शोमा सेन यांना अटीसह जामीन मंजूर केला. नक्षलवादांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली होती. शोमा सेन यांना ६ जून २०१८ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्या अटकेत आहेत. ‘याप्रकरणी युएपीए कायद्याच्या अंतर्गत जामीन नामंजूर करण्याचे बंधन नाही. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सेन यांचे वय बघता तसेच भरपूर कालावधी कारागृहात घातल्यामुळे त्यांना जामीन मिळविण्याचा हक्क आहे’, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय देताना नोंदविले. याबाबत नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीने (एनआयए) १५ मार्च रोजी सेन यांना आणखी काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह सेन यांचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिलेत.

हा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना काही अटी घातल्या आहेत. यात न्यायालयाच्या परवानगीशिवाय सेन यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाता येणार नाही. त्यांना त्यांचा पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल. यासह सेन यांना मोबाईल फोनची लोकेशन कायम सुरू ठेवावे लागेल. त्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणातील सोळा आरोपींपैकी शोमा सेन जामीन मिळविणाऱ्या सहाव्या आरोपी आहेत. यापूर्वी या प्रकरणात सुधा भारद्वाज,आनंद तेलतुंबडे, वर्नन गोन्साल्विझ, अरुण फेरेरा, वरवरा राव आणि गौतम नवलखा यांना जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT