Supreme Court observes — wife should not control or make husband dance on her fingers during a marital dispute hearing. saam tv
देश विदेश

Supreme Court: बायकोनं नवऱ्याला बोटावर नाचवू नये; सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

Supreme Court On Separation Case: सर्वोच्च न्यायालयाने एका विभक्त राहणाऱ्या जोडप्याच्या खटल्याप्रकरणी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवल आहे. नवरा-बायकोनं कशा प्रकारे एकमेकांशी वागावे याबाबत कोर्टानं टिप्पणी केली आहे.

Bharat Jadhav

  • सर्वोच्च न्यायालयाचे वैवाहिक वादाच्या खटल्यात महत्त्वाचं निरीक्षण.

  • पत्नीने नवऱ्याला बोटावर नाचवू नये, असं कोर्टाचं मत.

  • न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाचा निर्णय.

वैवाहिक वादाशी संबंधित एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. पत्नीने "तिच्या पतीला आपल्या मर्जीप्रमाणे किंवा बोटावर नाचवू नये. त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या खटल्या प्रकरणात नोंदवलंय. ही सुनावणी न्यायमूर्ती बीवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर.महादेवन यांच्या खंडपीठासमोर पार पडली.

" दोन्ही पक्षांना त्यांच्या अहंकाराचा त्याग करून मुलांच्या हितासाठी तडजोड करावी, असा सल्ला सर्वाच्च न्यायालयाने दिलाय. पत्नीने आपल्या नवऱ्याला त्यांच्या मर्जीने नाचवू नये, कौटुंबिक वादाचा सर्वात जास्त परिणाम हा मुलांच्या जीवनावर होत असतो. यामुळे पती-पत्नीनं अहंकार बाजुला ठेवून मुलांच्या भविष्याला प्राथमिकता दिली पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलंय.

ज्या जोडप्याचा खटला न्यायालयात दाखल झाला ते दोघेही सरकारी कर्मचारी आहेत. पती हा रेल्वे विभागात नोकरीला आहे. तर पत्नी रिझर्व्हे बँकेत नोकरी करते. ती सध्या आपल्या आई-वडिलांसोबत राहते. या दोघांचे लग्न २०१८ मध्ये लग्न झाले होते, त्यांना दोन मुले आहेत. यात पाच वर्षांची मुलगी, तीन वर्षांचा मुलगा आहे.

हे दोघे २०२३ पासून वेगळे राहत आहेत. पतीला त्याच्या सासरच्या लोकांसोबत राहायचे नाही, तर पत्नी आणि तिच्या कुटुंबाने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. पती-पत्नीमधील वाढत्या संघर्षामुळे त्यांची मुलेही आता मानसिक ताणतणावाने त्रस्त आहेत. जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आले तेव्हा दोन्ही पक्षांना शांत करण्याचे प्रयत्न करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

Election Roll Controversy in Maharashtra: बुलढाण्यात 1 लाख बोगस मतदार?मतदारयाद्यांमध्ये घोळ, आयोग करतंय काय?

Maharashtra Live News Update: मालेगावात किराणा दुकानातून गांजाची विक्री

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

SCROLL FOR NEXT