Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर

Supreme Court Rules : सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत पालकांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करता येईल, असा निकाल दिला आहे. कल्याण कायदा २००७ अंतर्गत वृद्धांच्या हक्कांना न्याय मिळाला आहे.
Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून  होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर
Supreme Court Saam Tv
Published On
Summary
  • सर्वोच्च न्यायालयाने पालकांच्या मालमत्तेबाबत ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

  • पालकांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करता येणार.

  • कल्याण कायदा 2007 अंतर्गत वृद्धांच्या संरक्षणावर भर दिली आहे.

  • ८० वर्षीय दांपत्याच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला.

जर तुमची मुले तुमचा सांभाळ करत नसतील किंवा तुमची जबाबदारी स्वीकारत नसतील तर त्यांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेतून बेदखल केले जाऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल योग्यरीत्या घेतली नाही तर, कल्याण कायदा २००७ अंतर्गत स्थापन नियमानुसार मुलाला त्यांच्या पालकांच्या मालमत्तेतून बेदखल करण्याचा आदेश जारी करण्याचा अधिकार आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात ८० वर्षीय पती पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मोठा मुलगा आई वडिलांचा सांभाळ करत नव्हता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी त्यांच्या मोठ्या मुलाला मालमत्तेतून बेदखल करण्याचा निर्णय दिला आहे.

Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून  होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर
Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

सर्वोच्च न्यायालयाने यावर भर दिला की जर मुले त्यांच्या पालकांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अयशस्वी झाली तर त्यांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेतून काढून टाकले जाऊ शकते. सर्व तथ्ये विचारात घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला असे आढळून आले की, ८० वर्षीय जोडप्याला मोठ्या मुलाने, जो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि व्यवसाय चालवतो त्याने आई वडिलांच्या मालकीच्या मुंबईतील दोन मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या आणि त्यानंतर पालकांना उत्तर प्रदेशात स्थलांतरित होण्यास परवानगी देण्यास नकार दिला.

Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून  होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर
Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, "पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्याचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि संरक्षण सुनिश्चित करणे, त्यांची देखभाल करणे हा आहे." खंडपीठाने म्हटले आहे की कायद्याच्या चौकटीप्रमाणे पालकांची तसेच वृद्ध नागरिकांची काळजी करणे हा कल्याण कायद्याचा मुख्य उद्देश आहे

Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून  होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर
Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की मुलं त्यांच्या पालकांची मालमत्ता हिसकावून घेऊ शकत नाही. असे केल्यास ते जबाबदाऱ्यांचे तसेच कायद्याचे उल्लंघन होऊ शकते. खंडपीठाने म्हटले आहे की, या तथ्यांचा विचार करून ८० वर्षीय जोडप्याच्या मुलाला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करण्याचा आदेश देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com