Neet Exam Saam Tv
देश विदेश

Neet Exam: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! नीट फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल

Supreme Court Rejected Re-examination Demand In NEET: नीट परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी फेटाळली आहे.

Rohini Gudaghe

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. कारण नीट पेपर लीक प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत महत्वपूर्ण निकाल दिलाय. नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेची मागणी फेटाळून लावली होती.

नीट परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट

मोठ्या प्रमाणावर पेपर फुटला नाही. नीट परीक्षेचा पेपर पटना, हजारीबाग या ठिकाणी फुटला होता. परीक्षा घेताना पद्धतशीर चुका झाल्या, असं म्हणता येणार नाही. आमचा निर्णय कोणाला पटला (Neet Exam) नसेल, तर तो हायकोर्टात जाऊ शकतो. एनटीएने भविष्यासाठी काळजी घ्यावी, अशा प्रकारचा निष्काळजीपणा टाळावा असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.

सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण काय?

सर्वोच्च न्यायालयाने २३ जुलै रोजी सुनावणी दरम्यान नीट परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला होता. सुप्रीम कोर्ट आजही ही याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे हजारो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले (Neet Re-examination) होते. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने NEET-UG प्रश्नपत्रिका कथित लीक केल्याप्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये १३ जणांना आरोपी करण्यात आलं होतं.

नीट परीक्षा पुन्हा होणार?

आज सुप्रीम कोर्टाने नीट फेरपरीक्षेच्या वादावर आपला निर्णय (Supreme Court) दिलाय. केवळ पाटणा आणि हजारीबाग केंद्रांवर परीक्षेत अनियमितता झाल्याचं न्यायालयाने म्हटलंय. संपूर्ण परीक्षेच्या अखंडतेवर कोणताही परिणाम झाला नाही. न्यायालयाने परीक्षा केंद्रांची प्रणाली सुधारण्यासाठी एनटीएची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीला सांगितलं (NEET Paper Leak Case) आहे. एनटीएच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने २२ जून रोजी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. न्यायालयाने तज्ज्ञ समितीकडून ८ मुद्यांवर उत्तरे मागवली आहेत. त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT