NEET Result: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर NTAचं मोठं पाऊल; पुन्हा एकदा NEET चा निकाल केला जाहीर, ऑनलाईन कसा पाहाल?

NEET Result 2024 Out: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. नीटचा निकाल ऑनलाइन पद्धतीने कसा पाहायचा ते जाणून घ्या.
NEET Result
NEET ResultSaam Tv
Published On

नीट मुख्य परीक्षेचा निकाल आज म्हणजेच २० जुलै रोजी जाहीर झाला आहे.आज दुपारी १२ वाजेपर्यंत नीटचा निकाला ऑनलाइन पद्धतीने जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आज विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाइन पद्धतीने अपलोड केले आहे.

५ ने रोजी झालेल्या नीट परीक्षेचा शहर आणि सेंटरनुसार निकाल जाहीर करण्यात आली आहे. NTA NEET UG https://Exams.nta.ac.in/NEET/या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल चेक करण्यासाठी तुम्ही NEET (UG) RESULT 2024 CITY/CENTER WISE वर क्लिक करा. हा निकाल अपलोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत दिली होती.

निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या निकालात विद्यार्थ्यांचे नाव, माहिती शेअर केलेली नाही. फक्त विद्यार्थ्यांच्या उत्तपत्रिकांचा नंबर आणि त्यासमोर गुण जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची माहिती कोणासोबतच शेअर केली जाणार नाही.

NEET Result
Manoj Soni Resign: UPSC चेअरमन मनोज सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा; पूजा खेडकर प्रकरणामुळं घटनेला महत्त्व

निकाल कसा तपासायचा?

सर्वप्रथम नीटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

डॅशबोर्डवरील NEET (UG) निकाल शहर/केंद्रानुसार यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या शहराचे नाव लिहा. त्यानंतर विद्यार्थ्याच्या परीक्षा केंद्राचे ठिकाण लिहा.

यानंतर तुमच्या स्क्रिनवर एक पीडीएफ उघडेल. त्यात विद्यार्थ्याच्या अनुक्रमांकानुसार गुण तपासा.

NEET Result
Crime News : बायकोला मित्रासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com