shiv sena mla case
shiv sena mla case  Saam TV
देश विदेश

Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : शिवसेना फुटीचे पडसाद लोकसभा निवडणुकीतही दिसत आहे. शिवसेना फुटीनंतर राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने उभे ठाकले आहेत. अशातच दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरण कोर्टात सुरु आहे. याच प्रकरणात राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. यामुळे या प्रकरणी सुनावणी १४ मे रोजी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. याच प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधीत ठाकरे गटाच्या याचिकेवरील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी आता १४ मे रोजी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी उद्याची म्हणजे २६ एप्रिल ही तारीख निश्चित केली होती. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार अपात्र केले नाही म्हणून ठाकरे गटाने दाखल याचिका दाखल केली होती. या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात की मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार हे देखील १४ मे रोजी स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT