Supreme Court: भारताला मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश  
देश विदेश

Supreme Court: भारताला मिळणार पहिली महिला सरन्यायाधीश

सरन्यायाधीश एन.व्ही.रामाना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीनंतर 9 न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये 3 महिला न्यायाधीश आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विहंग ठाकूर

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) न्यायाधीशांच्या 9 रिक्त पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नियुक्तीच्या प्रक्रियांमध्ये तीन महिला न्यायाधिशांचाही समावेश आहे. जर यात महिला न्यायाधीशांची नियुक्ती झाली तर, देशाला आणि सर्वोच्च न्यायालायाला पहिली महिला सरन्यायाधीश (chief justice of India) मिळू शकते.

हे देखील पहा -

सरन्यायाधीश एन.व्ही.रामाना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीनंतर 9 न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केंद्राकडे पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये 3 महिला न्यायाधीश आहेत.

नियुक्तीसाठी कॉलेजियमने केंद्र सरकारकडे जी नावे पाठवली आहेत, त्यात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या  न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना यांचे नाव आहे, ज्या  पदोन्नतीद्वारे देशातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनू शकतात. त्यानंतर कॉलेजियमने तेलंगणा उच्च न्यायालयाच्या हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयाच्या बेला त्रिवेदी यांच्याही नावांची शिफारसही केली. या तीन महिला न्यायाधीशांव्यतिरिक्त कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय श्रीनिवास, गुजरातचे विक्रम नाथ, सिक्कीमचे जितेंद्र कुमार माहेश्वरी, केरळ चे सीटी रविकुमार आणि एम.एम सुंदरेश यांचाही समावेश आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Exit Polls : भाजपला मोठा धक्का; बिहारमध्ये तेजस्वी यादव धोबीपछाड देणार, एग्झिट पोलचा अंदाज

दिल्लीत स्फोट, महाराष्ट्रात धागेदोरे? डॉ. शाहीनाचं मुंबई कनेक्शन?

Maharashtra Live News Update: प्रॉपर्टीच्या वादातून भावकीत फ्री स्टाईल हाणामारी

Mumbai Politics: मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला धक्का; ८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Girija Oak: 'नॅशनल क्रश' बनलेली अभिनेत्री गिरिजा ओकचं वय किती?

SCROLL FOR NEXT