सांगली : कोणत्याही योजने शिवाय सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न तूर्त मिटला आहे. जिल्ह्यातील कृष्णा नदीचेKrishna River पाणी शेजारच्या कर्नाटक राज्यातून ओव्हरफलो होऊन नैसर्गिकरित्या दुष्काळी भागात दाखल होत असल्याने गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळग्रस्तांची पाण्याची समस्या मिटली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी कृष्णा लवादातील मानवता धर्मा प्रमाणे पाण्याच्या बदल्यात पाणी हा सामंजस्य करार केल्यास जत तालुक्यातील दुष्काळाचा प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो.So the water problem in Jat taluka can be solved permanently
हे देखील पहा-
राज्य सरकारनेState Goverment पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी अधिकृत सामंजस्य करार केल्यास कोट्यवधी रुपयांच्या खर्चाविना जतच्या 65 गावांचाVillages पाणी प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो असही बोलले जात आहे.
सांगलीSangali जिल्ह्यातील जतJat तालुका म्हणजे दुष्काळी तालुका म्हणून आजही ओळखला जातो तालुक्यातील पाणी टंचाई दूरWater scarcity करण्यासाठी युतीच्या काळात कृष्णा नदीचेKrishna River पाणी तालुक्याला देण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजनाMhaisal Irrigation Scheme सुरू झाली. मात्र आद्यपही म्हैसाळ सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे आजही 65 गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर आणि कायम आहे. गत भाजपा सरकारच्या काळात म्हैसाळ विस्तारित योजना आखण्यात आली. त्याला तत्त्वता मंजुरीही मिळाली. पण कृष्णा लवादामुळे पाण्याच्या प्रश्न याठिकाणी निर्माण झाला. आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील Water Resources Minister Jayant Patil यांनी वारणा नदीच्या माध्यमातून 6 टीएमसी6TMC पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या विस्तारीत योजनेसाठी जरी 6 टीएमसी पाणी उपलब्ध झाले असले तरी ही योजना अजून कागदावरतीच आहे. प्रत्यक्षात ती येण्यासाठी जवळपास 846 कोटींचा आवश्यकता आहे. आणि ती पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल,हे माहिती नाही. त्यामुळे 65 गावांना प्रत्यक्ष पाणी कधी मिळेल,हा मोठा प्रश्न आहे? एका बाजूला ही परिस्थिती असतानाच गेल्या दीड वर्षांपासून मात्र जत पूर्व भागातील पाण्याची टंचाई गायब झाल्याची स्थिती आहे.
दरवर्षी पूर्व भागातील 65 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सूरु करावे लागत, जवळपास प्रशासनाला 13 ते 17 कोटी यासाठी खर्चही करावा लागतो. मात्र दीड वर्षात याठिकाणी एक टँकरची गरज भासली नाही. म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले नसताना, हे सर्व शक्य झाले आहे, ते म्हणजे शेजारच्या कर्नाटकच्या राज्यातील तुबची-बबलेश्वर योजनेमुळे. म्हैसाळ ऐवजी याठिकाणी आता कर्नाटकच्या तुबची-बबलेश्वर सिंचन योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे.
ओव्हरफ्लो मुळे सायफन पद्धतीने दाखल झालेले कर्नाटकातील पाण्यामुळे तालुक्यातील मोटेवाडी, तिकोंडी 1,तिकोंड 2 ,भीवर्गी आणि सिद्धनाथ तलाव भरले आहेत. त्यामुळे जवळपास 30 ते 35 गावांचा पाण्याचा प्रश्न तूर्त मिटला आहे. तर या पाण्यामुळे या भागातील भूजल पातळीही वाढली आहे. परिणामी गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळग्रस्तांची तहान भागात आहे.
कोणत्याही योजने शिवाय जत तालुक्यात जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पाणी शेजारीच्या कर्नाटक Karnatakaराज्याच्या तुबची-बलेश्ववर Tubchi-Baleshwar योजनेच्या माध्यमातून ओव्हरफ्लो होऊन पोहचत आहे. हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी कृष्णा लवादातील मानवता धर्मा प्रमाणे पाण्याच्या बदल्यात पाणी हा सामंजस्य करार केल्यास जत तालुक्यातील दुष्काळाचा Drought प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो,अशी धारणा दुष्काळग्रस्त जनतेची आहे.
Edited By-Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.