Extramarital affair Case Saam tv
देश विदेश

Extramarital affair Case : दोन मुलांच्या आईचे अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडचा लग्नासाठी नकार; बलात्काराची तक्रार, कोर्टाने महिलेला फटकारले, नेमकं काय घडलं?

supreme court on Extramarital affair Case : बॉयफ्रेंडने लग्नासाठी नकार दिल्यानंतर विवाहित महिलेने पोलिसांत तक्रार दिली. हे प्रकरण कोर्टात गेलं. या प्रकरणात कोर्टाने महिलेला फटकारले.

Vishal Gangurde

सुप्रीम कोर्टाने बुधवारी अनैतिक संबंधाच्या प्रकरणात महिलेलाच फटकारलं. विवाहित महिलने लग्नाचं आश्वासन देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीची जामीन रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केली होती. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात निर्णय देताना महिलेलाच सुनावलं. महिलेने लग्न झाल्यानंतर पती असताना देखील इतर व्यक्तीशी संबंध ठेवले. त्यानंतर त्याच्या विरोधातच गुन्हा नोंदवला.

लग्न झालेल्या महिलेच्या वकिलाने युक्तिवाद करताना म्हटलं की, 'आरोपी व्यक्तीने लग्नाचं खोटं आश्वासन देऊन महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले'. तर न्यायाधीश एम एम सुंदरेश आणि न्यायाधीश एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने महिलेला म्हटलं की, तुम्ही विवाहित आहात. तुम्हाला दोन मुले आहेत. तुम्ही एक प्रौढ्य व्यक्ती आहात. तुम्हाला अनैतिक नात्याची जाण होती. तुमचं लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवले'.

वकिलाने पुढे युक्तिवाद करताना म्हटलं की, 'लग्नाचं खोटं आश्वासन देऊन अनेकदा हॉटेल आणि रेस्ट हाऊसमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले'. खंडपीठाने यावर म्हटलं की, 'तुम्ही आरोपीच्या बोलण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेल्या? तुम्हाला चांगलं ठाऊक होतं की, तुम्ही लग्न असतानाही इतर व्यक्तीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा अपराध केला'.

खंडपीठाने पुढे म्हटलं की, पटना कोर्टाने आरोपी अंकित बनरवाल याला अंतरिम जामीन देऊन योग्य केलं. त्यानंतर महिलेची याचिका फेटाळून लावली'. पण खालच्या कोर्टाने बनरवाल यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता.

लग्न झालेली महिला आणि बरनवाल यांची २०१६ साली सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची ओळख झाल्यावर नातं प्रस्थापित केलं. महिलेने आरोप करताना म्हटलं की, बनरवालच्या दबावामुळे नवऱ्याला घटस्फोट मागितला होता. हा घटस्फोट ६ मार्च रोजी मंजूर झाला होता.

घटस्फोटानंतर २ आठवड्यांनी महिलेने बॉयफ्रेंड बरनवालला लग्नासाठी विचारलं. मात्र, त्याने लग्न करण्यास नकार दिला. बरनवालने लग्नाचा नकार दिल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. बरनवालने लग्नाचं खोटं आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला. हायकोर्टाने नोंदीनुसार, बरनवालने महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले नव्हते. ही बाब लक्षात घेत बरनवालला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT