मोहाली : शिरोमणी अकाली दलाचे (Akali Dal) नेते बिक्रम सिंह मजिठिया (Bikram Singh Majithia) यांना आज सर्वाेच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात बिक्रम सिंह मजिठिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. बिक्रम सिंह मजिठिया (Bikram Singh Majithia Latest Marathi News) यांनी सर्वाेच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन (bail) अर्ज दाखल हाेता. त्यास न्यायालयाने (Supreme Court) मंजूरी दिली आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत (punjab elections) शिरोमणी अकाली दल (akali dal) ने माजी मंत्री बिक्रम सिंग मजीठिया हे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांच्या विरोधातले उमेदवार असल्याने आजच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने पंजाबच्या काॅंग्रेसला माेठा धक्का बसला आहे.
मजिठिया यांना सर्वोच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत जामीन मंजूर केला आहे. तोपर्यंत पंजाब सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकणार नाही. आता मजिठिया पंजाबमध्ये उघडपणे प्रचार करू शकतात. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर हा दिलासा देण्यात आला आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या तोंडावर असा गुन्हा नोंदवल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पंजाबमधील काँग्रेसला (congress) मोठा धक्का बसला आहे.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.