Supreme Court of India latest hearing 
देश विदेश

ऐतिहासिक निर्णय! सर्वोच्च न्यायालयाची हरीशच्या इच्छामरणाला मंजूरी, नेमकं काय प्रकरण काय?

passive euthanasia law : १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांना निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी देत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

Namdeo Kumbhar

Harish Rana Passive Euthanasia Case : १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरिशला निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने घेतला. ३२ वर्षाच्या हरिश राणा हा मागील १३ वर्षांपासून कोमात होता, त्याला आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची मंजूरी दिली. कॉमन कॉज निकालाच्या (२०२३ मध्ये सुधारित) संदर्भातून सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याच्या मूलभूत अधिकाराला मान्यता देणारा हा सुप्रीम कोर्टाचा पहिलाच आदेश ठरलाय. न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने ३२ वर्षाच्या हरीश याची लाईफ सपोर्ट सिस्टम काढून घेण्याची परवानगी दिली.(Supreme Court passive euthanasia order in Harish Rana case)

गाझियाबादमधील ३२ वर्षाचा हरीश राणा मागील १३ वर्षांपासून कोमात होता. तो फक्त मशीन आणि ट्यूबवर जगत होता. त्याच्या वडिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने लाईफ सपोर्ट सिस्टम काढून टाकण्याची परवानगी दिली आहे. २०१८ च्या कॉमन कॉज निकालावर हा निर्णय देण्यात आल आहे. या कॉजमध्ये सन्मानाने मरण्याचा मूलभूत अधिकार मान्य करण्यात आलाय.ही मार्गदर्शक तत्त्वे प्रत्यक्षात लागू करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे कोर्टाने निर्णय देताना सांगितले.

१३ वर्षांपासून हरीश कोमात का होता? नेमकं काय झालं होतं?

हरीश राणा शाळा, महाविद्यालयात हुशार होता. सर्वांसोबत तो मिळून मिसळून राहायचा. पण २०१३ मध्ये हरीशसोबत एक दुर्घटना घडली. चंदीगडमधील पेइंग गेस्ट हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावरून हरीश खाली पडला अन् त्याचं आयुष्यच बदलले. त्याच्या मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो कायमचा व्हेजिटेटिव्ह अवस्थेत (बेशुद्धीची अवस्था) गेला. तो १००% क्वाड्रिप्लेजिक झाला होता.

१३ वर्षे कोमात अन्...

मागील १३ वर्षांपासून हरीश कोमात होता. त्याच्या प्रकृतीत तिळभरही फरक नव्हता, अंथरुणाला खिळून होता. ट्रेकिओस्टोमी ट्यूबद्वारे श्वास दिला जात होता. पोटात टाकलेल्या पीईजी ट्यूबद्वारे क्लिनिकली अॅडमिनिस्ट्रेटेड न्यूट्रिशन (सीएएन) द्वारे त्याचं आयुष्य सुरू होतं. वैद्यकीय अहवालांमध्ये त्यांच्या संपूर्ण शरीरात मोठ्या प्रमाणात बेडसोर्स असल्याचे दिसून आले. हरीश बरं होणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळेच त्याच्या इच्छामरणाची मागणी कुटुंबियांनी कोर्टात केली होती. आज यावर सुनावणी झाली अन् कोर्टानं कोमात असलेल्या हरीश याच्या इच्छामरणाचा ऐतिहासिक निर्णय दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara: ९ वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; शाळेची तयारी करताना जागीच प्राण सोडले

Ladki Bahin Yojana: जुलैचा पहिला आठवडा संपला, जूनचा १५०० रुपयांचा हप्ता कधी येणार? लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत कैलास लस्सी स्वीट मार्टच्या किचनला आग, कर्मचाऱ्यांनी केली स्वतःची खिडकीतून सुटका

Monsoon Hacks : बुरशीमुळे लोणचे फेकून देताय? थांबा! पावसाळ्यात वापरा 'ही' ट्रिक, लोणचे महिनोनमहिने राहील ताजे

LPG News: मोठी बातमी! LPG गॅस सिलिंडरचे संकट संपणार, भारतीय तेल कंपन्यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT