Monsoon Hacks : बुरशीमुळे लोणचे फेकून देताय? थांबा! पावसाळ्यात वापरा 'ही' ट्रिक, लोणचे महिनोनमहिने राहील ताजे

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे लोणच्याला बुरशी लागते आणि ते लवकर खराब होते. त्यामुळे ओलाव्यामुळे लोणचे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आताच हे घरगुती उपाय करा.

Monsoon | pinterest

तेलाचा वापर

लोणच्याचे काचेच्या बरणीत भरल्यावर त्यावर कोमट तेलाचा एक थर टाका. पावसाळ्यात तेलाची पातळी कमी झाल्यास, ती कोमट मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाने भरून काढा.

Oil | pinterest

कोरड्या चमच्याचा वापर

पावासळ्यात ओलाव्यामुळे बुरशी निर्माण करणारे जीवाणू आत येतात. लोणचे काढताना पूर्णपणे कोरडा चमचा वापरा आणि ओला किंवा वापरलेला चमचा कधीही बरणीत टाकू नका.

Use a Dry Spoon | pinterest

स्टोअर करण्याची पद्धत

लोणचे कधीही हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करा. तसेच तुम्ही सिरॅमिकच्या बरण्यांमध्ये साठवू शकता. प्लास्टिक किंवा धातूची भांडी आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया करून हवा आत शिरू शकतात.

Storage Method | pinterest

लोणच्याची बरणी कुठे ठेवावी?

लोणच्याची बरणी गॅसच्या शेगडीच्या उष्णतेपासून आणि वाफेपासून दूर, थंड, अंधाऱ्या आणि कोरड्या कपाटात ठेवा. लोणच्याच्या बरण्या फ्रिजमध्ये ठेवणे टाळा, कारण तापमानातील चढउतारामुळे त्यात ओलावा जमा होऊन बुरशीची वाढ होऊ शकते.

Where to Keep the Pickle Jar? | pinterest

वापर कसा करावा

पावसाळ्यात थेट मोठी लोणच्याची बरणी वापरण्यापेक्षा त्यातील थोडे थोडे लोणचे छोट्या बरणीत काढून रोजसाठी वापरा. जेणेकरून सर्व लोणचे वारंवार ढवळले जाणार नाही आणि ते दिर्घकाळ टिकेल.

How to Use | pinterest

मीठ - मसाले घाला

मीठ आणि मसाले preservatives म्हणून काम करतात, जे जिवाणू आणि बुरशीची वाढ रोखतात.

Add salt and spices. | pinterest

NEXT : पाऊस सुरू होताच लाईट का जाते? कारण काय तुम्हाला माहितीये?

Rainy Season | saam tv
येथे क्लिक करा...