Zydus Cadila Saam TV
देश विदेश

आनंदाची बातमी! Zydus Cadilaकडून सरकारला कोरोना लसीचा पुरवठा सुरु

लस नागरिकांनी लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी कंपनी मार्केटमध्येही लस ठेवणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देश गेली दोन वर्ष झालं कोरोनाशी लढा देत आहे. सध्या कोरोनावरती मात करण्यासाठी प्रामुख्याने दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. औषध कंपनी Zydus Cadila ने बुधवारी सांगितले की त्यांनी केंद्र सरकारला त्यांच्या कोविड-19 लस ZyCoV-D चा पुरवठा सुरू केला आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंपनीने पुरवठा सुरू केला आहे, असे औषध कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. लस नागरिकांनी लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी कंपनी मार्केटमध्येही लस ठेवणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ZyCoV-D ही तीन डोसची लस आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही लस 265 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर अर्जदाराला ही लस 93 रुपयांना मिळणार असल्याचे कंपनीच्या वतीने सागण्यात आले आहे. अहमदाबादमधील या औषध बनवणाऱ्या कंपनीने शिल्पा मेजीकेअर लिमीटेड या कंपनीसोबत करार केला आहे. Zydus Cadila आणि शिल्पा मेडिकेअर मिळून ही लस बनवणार आहे. प्लास्मिड DNA लस बनवण्यासाठी कंपनीने Enzychem Lifesciences या कोरियन कंपनीसोबतही करार केला आहे. ZyCoV-D ही एक प्लास्मिड डीएनए लस आहे जी SARS-CoV-2 विषाणूविरुद्ध लढण्यासाठी स्पाइक प्रोटीन तयार करते आणि मानवी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT