भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी नासाची मोहीम फेब्रुवारीपर्यंत लांबल्याची शक्यता असताना आता सुनीता विल्यम्सच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.
सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या (Microgravity) प्रदीर्घ संपर्कामुळे स्पेस स्टेशनवर विल्यम्सला दृष्टीसमस्या येत असल्याची माहिती आहे. स्पेसफ्लाइट असोसिएटेड न्यूरो-ऑक्युलर सिंड्रोम (SANS) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या समस्येचा शरीरातील द्रव वितरणावर (Fluid Distribution) परिणाम होतो, ज्यामुळे डोळ्यांची समस्या निर्माण होते. यामुळे अंधुक दृष्टी आणि संरचनेत बदल होतात. सुनीता विल्यम्सच्या कॉर्निया, डोळ्यातील पडदा आणि लेन्सच स्कॅनिंग करण्यात आलं होतं. त्यामध्ये तिला डोळ्यांची गंभीर समस्या असल्याचं निदान झालं आहे.
मायक्रोग्रॅव्हिटी ही अशी स्थिती आहे ज्यात एखाद्या वस्तूचे स्पष्ट वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वजनाच्या तुलनेत खूपच कमी होते. याला शून्य गुरुत्वाकर्षण देखील म्हटलं जातं.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर एक आठवड्यासाठी अंतराळात गेले होते. मात्र स्टारलाईनमध्ये हेलियमची गळती सुरू झाल. तसंच डॉकिंग सिस्टमही खराब झाली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ते अतंराळात अडकून पडले आहेत. पृथ्वीवर परत येण्याचा त्यांचा कालावधी वाढला आहे. त्यातच नासाने एक नवीन पर्याय निवडला आहे. क्रू ड्रॅगन फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परत येईल आणि जर ही योजना यशस्वी झाली, तर बोईंगचे स्टारलाइनर क्रूशिवाय परत येईल , ज्याला संपूर्णपणे संगणकाद्वारे नियंत्रित केले जाणार आहे.
स्पेसएक्सच्या स्पेसक्राफ्टवर स्वीच करणे बोईंगसाठी मोठा धोका मानला जात आहे, कारण बोईंगला टीकेचा सामना करावा लागत आहे. ही मोहीम लांबणीवर पडली आहे, खूप खर्चिकही होणार आहे. एरोस्पेस जायंट अनेक तांत्रिक समस्यांशी झुंजत आहे. त्यातच नासाने SpaceX ची निवड केली तर कंपनीच्या प्रतिष्ठेला आणखी ठेच पोहोचण्याची शक्यता आहे. नासासमोर सर्वात मोठं आव्हान असेल ते म्हणजे स्पेससूट. बोइंगच्या स्टारलाइनरसाठी डिझाइन केलेले स्पेस सूट स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनसाठी योग्य नाहीत. याचा अर्थ असा की जर अंतराळवीर ड्रॅगनवर परतले तर त्यांना त्यांच्या सूटशिवाय असे करावे लागेल, ज्यामुळे सुरक्षा चिंता वाढू शकते. NASA या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे आणि क्रू-9 ड्रॅगन मिशनसह अतिरिक्त SpaceX फ्लाइट सूट पाठवण्याचाही विचार केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.