gorakhpur crime Saam tv
देश विदेश

Shocking News: सॉरी आई-बाबा! माझी वेळ संपली आहे ... देवाने मला फक्त १८ वर्षांसाठीच पाठवले होते";आत्महत्येची चिठ्ठी लिहून संपवले स्वतःचे जीवन

18 year-old girl commits suicide after JEE Mains failure : स्पर्धात्मक परीक्षेचा मंगळवारी जेईई मेन्सचा निकाल जाहीर झाला.यामध्ये एका १८ वर्षीय तरुणीला कमी गूण मिळाल्याने निराश होऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Saam Tv

जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) मेन २०२५ मध्ये कमी गुण मिळाल्याने निराश होऊन उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे बारावीच्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह हा हॉस्टेल मध्ये तिच्या रूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. यामुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.

"आई-बाबा मला माफ करा. मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही. तुम्ही खूप चांगले आई-बाबा आहात,तुम्ही नेहमीच मला पाठिंबा दिला, माझ्यावर खूप प्रेम केलं. पण आता माझी वेळ संपली आहे. मी इथेच थांबते आहे. देवाने मला फक्त १८ वर्षासाठीच पाठवले होते अस चिठ्ठीमध्ये लिहीत या मुलीने गळफास लाऊन स्वतःचे जीवन संपवले.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आदिती मिश्रा आहे. दोन दिवसापूर्वी आदिती घरातून हॉस्टेलमध्ये गेली होती. बुधवारी सकाळीच तिचे वडिलांशी बोलनेही झाले आणि तिने मोबाईल फोनही रीचार्ज केला. तिला निकालात कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात होती. माझ्या निकालाबाबत कोणाला सांगू नका असा आदितीने वडिलांना सांगितले. तिच्या वडिलांनी तिला धीर देण्याचा बराच प्रयत्न केला. तसेच पुढच्या परीक्षेसाठी तिला परत जोमाने अभ्यास करण्याचा सल्ला देत प्रोत्साहित केले. पण आदिती ही इतके टोकाच निर्णय घेईल याची कल्पनाही आम्ही कधी नव्हती केली असं तिच्या वडिलांनी सांगितले.

हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह

आदिती गोरखपूरमधील मुलींच्या हॉस्टेलमध्ये खोली क्रमांक 86 मध्ये राहत होती. बराच वेळ खोली बंद असल्याने आणि आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या मैत्रिणींनी हॉस्टेल वॉर्डनला कळवले. पोलिसांच्या मदतीने दार उघडले असता, ती पांढऱ्या स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. तसेच खोलीत सुसाईड नोट देखील सापडली.आदितीचा मृतदेह बघून तिच्या मैत्रिणी ढसाढसा रडल्या. या घटनेने संपूर्ण हॅास्टेल हादरले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. गोरखपूरच्या एसपी सिटी अभिनव त्यागी यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत.आज तरुणाईंमध्ये अपयश पचवण्याची क्षमता शिल्लक राहिली नसल्याचे दिसून येत आहे. अपयश आल्यामुळे तरुणाई ही नैराशात जात आहे. यामुळे आत्महत्येचे विचार येत असतील तर तातडीने कुटुंबीय, मित्र किंवा समुपदेशकाशी संपर्क साधावा. मदतीसाठी 'कॉल फॉर लाइफलाइन' सारख्या हेल्पलाइन नंबरचा वापर करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Flood: अतिवृष्टीनं शेतीचा चिखल, सरकार ओला दुष्काळ’ जाहीर करणार का?

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

Maharashtra Live News Update: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'मुळे राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज? राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर

Crime: गे डेटिंग अ‍ॅपवर ओळख, अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण, बड्या राजकीय नेत्यासह १४ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT