Sudhakar Badgujar joins BJP after being ousted by Thackeray Sena; party workers express visible displeasure. Saam tv
देश विदेश

Maharashtra Politics : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का; राजकीय नाट्यानंतर बडगुजर भाजपात, वाचा स्पेशल रिपोर्ट, VIDEO

sudhakar badgujar : ठाकरे गटाने हकालपट्टी केलेल्या सुधाकर बडगुजर यांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय.. मात्र बडगुजरांच्या प्रवेशामुळे भाजपात नाराजीची लाट आहे... ती नेमकी कशी? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये

Bharat Mohalkar

सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याच्या आरोपामुळे बडगुजरांविरोधात विधानसभेत रणकंदन माजलं.. मात्र याच सुधाकर बडगुजर यांनी नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपात प्रवेश केलाय... ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर नाशिकच्या आमदार सीमा हिरेंचा विरोध असतानाही मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीने सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, भाजप प्रवेश निश्चित झाला.. तर शक्तीप्रदर्शन करत बडगुजर मुंबईत दाखल झाले. मात्र त्याविषयी भाजप नेतेच अनभिज्ञ असल्याचं समोर आलं.

बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर बडगुजर भाजपात दाखल झाले... तर सकाळी अनभिज्ञ असलेले भाजप नेतेच पुष्पगुच्छ घेऊन बडगुजरांच्या स्वागताला हजर होते.

तर विरोधकांनी मात्र भाजपच्या जुन्या आरोपांची आठवण करुन देत भाजपचीच कोंडी केलीय. नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबनराव घोलप, मनसे नेते अशोक मुर्त़डक यांनी भाजपात प्रवेश केलाय..

त्यामुळे आता आपणच केलेल्या आरोपांमुळे प्रतिमा मलिन झालेल्या बडगुजर यांना सोबत घेऊन भाजप नाशिक महापालिकेत 100 पार जाणार की बडगुजर यांचा भाजपलाच फटका बसणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT