Chandrayaan-3 Launch Today Saam TV
देश विदेश

Chandrayaan-3 Launch Today: चांद्रयान ३ ची यशस्वीरित्या अवकाशात झेप; पाहा थेट प्रक्षेपण

Launch Of Chandrayaan-3: चंद्रयान ३ ने आज दुपारी २.३५ मिनीटांनी आकाशात झेप घेतली आहे.

Ruchika Jadhav

Launch Of Chandrayaan-3: गेल्या काही दिवसांपसून संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या चंद्रयान ३ ने आज दुपारी २.३५ मिनिटांनी आवकाशात झेप घेतली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यान प्रक्षेपित करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

एलएमव्ही-३ या रॉकेटचा वापर करुन चांद्रयान ३ लाँच करण्यात आलं आहे. हे यान २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्रावर लँड होईल. चांद्रयान ३ चे लाईव्ह प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्रातून पाहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

यानाचं वजन किती होतं?

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान- ३ (Chandrayaan-3) मध्ये विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल यांचा समावेश आहे. या यानाचं वजन ३,९०० किलो इतकं आहे. चांद्रयान-३ च्या मॉड्यूलचं वजन २,१४५.०५ किलो आहे. तर १,६९६.३९ किलोचं केवळ इंधन आहे.

चांद्रयान-३ ने अवकाशात झेप घेतल्यावर त्याचे काही भाग वेगळे झाले. त्यानंतर मुख्य यानाने चंद्राच्या (Moon) दिशेने झेप घेतली. या प्रसंगी सतीश धवन केंद्रात केंद्र सरकारचे अनेक मंत्री उपस्थित होते.

अभिनंदनाचा वर्षाव

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी देखील इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान ३ अवकाशात यशस्वीपणे झेपावल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अभिमानाचा क्षण आहे. अभिनंदन!, हा खास क्षण कायम स्मरणात राहील. प्रत्येक भारतीयासाठी हा आजचा दिवस अभिमानास्पद आहे, असं ट्विट त्यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणातील विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

Beed Flood: अतिवृष्टीनं शेतीचा चिखल, सरकार ओला दुष्काळ’ जाहीर करणार का?

Wednesday Horoscope : भाग्यकारक घटना घडणार; ५ राशींच्या लोकांवर आनंदाची उधळण होणार

Maharashtra Live News Update: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT