Rahul Gandhi 
देश विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं नागरिकत्व धोक्यात? भाजप नेत्याने घेतली हायकोर्टात धाव, काय आहे प्रकरण?

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरून भाजप नेत्याने हायकोर्टात धाव घेतली आहे. राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माजी राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. राहुल गांधी यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठी गृह मंत्रालयाने निर्देश देण्याची मागणी केली आहे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

याचिकेत सुब्रह्मण्यम स्वामी यांचं म्हणणं आहे की, 'राहुल गांधी यांचं नागरिकत्वाबाबत पाच वर्षांपूर्वी गृह मंत्रालयात तक्रार केली होती. यावर गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यांनी याबाबत काय निर्णय घेतला, काय कारवाई केली, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत आरटीआयमधून माहिती मागितली होती. या अर्जावर केंद्र सरकारने माहिती देण्यास नकार दिला होता. एका व्यक्तीने आरटीआय अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी माहिती मागितली होती. यानंतर गृह मंत्रालयाने म्हटलं होतं की, आरटीआय कलम ८(१), (एच) आणि (जे) अंतर्गत कोणताही खुलासा केला जाऊ शकत नाही. माहिती दिल्यास तपासात अडथळा येऊ शकतो'.

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित करत सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काही वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत गृह मंत्रालयाला तपास करण्याच्या सूचना केली होती. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील घटनापीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.

गोगोई यांनी म्हटलं होतं की, 'जर कोणती कंपनी कोणत्या फॉर्ममध्ये राहुल गांधी यांना ब्रिटिश नागरिक असल्याचे म्हणत असेल, तरी ते ब्रिटिश नागरिक होत नाहीत. या सर्व प्रकरणावर राहुल यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं की, 'संपूर्ण देशाला माहीत आहे की, 'राहुल यांचा जन्म भारतात झाला असून ते भारतीय आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेलमधून गुंड लढले, निवडणूक जिंकले; गुंडांच्या गुंडगिरीला जनतेचा कौल

MMR मध्ये बविआनं रोखला भाजपचा रथ; वसई- विरारमध्ये बविआ अभेद्य

Explainer : मुंबईतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुंरधर कोण? यशामागे नेमकी काय होती रणनीती? वाचा

BMC Election: मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर; काँग्रेस, शिवसेना, RPIनंतर भाजपला संधी

मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर; तुमच्या वॉर्डाचा नगरसेवक कोण? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT