नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन (Jantar Mantar Protest) यशस्वी झाल्यानंतर आता पंजाबमध्येही पेपरफुटीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. चंदीगडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी भगवंत मान सरकारविरोधात निदर्शने सुरू केली. पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैंस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann Government) यांच्या विरोधात एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पंजाबमध्ये फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेचे पेपर फुटल्याच्या (exam paper leak) मुद्द्यावरून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याशिवाय इतर परीक्षांचे पेपर फुटल्याच्या मुद्दाही उचलून धरला आहे. मात्र, पंजाबमध्ये फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेदरम्यान पेपर फुटल्याच्या आरोपांचं शिक्षण मंत्री हरजोत सिंह यांनी खंडन केलं आहे.
हे प्रकरण पेपरफुटीचे नसून, हायटेक उपकरणांच्या माध्यमातून कॉपी केल्याचं प्रकरण आहे. दुसरीकडे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून एबीव्हीपीच नाही, तर भाजप, काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्ते देखील मान सरकारविरोधात आंदोलन करत आहे.
गेल्या साडेचार वर्षांत अनेकदा विविध परीक्षांचे पेपर फुटल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात राज्यात एकाही परीक्षेचा पेपर फुटला नाही, असे सांगण्यात येत आहे. काँग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भाजपकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा दावा आम आदमी पक्षाकडून केला जात आहे.
या राजकीय पक्षांकडे मान सरकारविरोधात एकही मुद्दा नाही. त्यामुळे खोटे पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांनी १९ जुलै रोजी फार्मसी अधिकारी भरती परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील ११ जण आणि १० उमेदवारांनाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.