Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: खतरोंका खिलाडी! उत्तरपत्रिकेत लिहली चक्क चित्रपटाची गाणी, मास्तरांनी दिला 'हा' खतरनाक शेरा; VIDEO तुफान VIRAL

Songs In Answer Sheet Viral Video: शिक्षकांचा शेरा पाहून नेटकऱ्यांनी शिष्य शेर तर गुरू सव्वाशेर अशा जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Gangappa Pujari

Student Write Song In Exam Viral Video: परिक्षेत उत्तरे येत नसल्यास अनेकदा आता काय लिहावं असा प्रश्न आपल्यालाही पडतो. अशा प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकेत मजेशीर उत्तरेही लिहली जातात, जी पाहून शिक्षकही अचंबित होतात. पण उत्तर येईना म्हणून चित्रपटातील गाणी लिहल्याचा प्रकार तुम्ही कधीही ऐकला नसेल.

पण सध्या असाही एका विद्यार्थ्याचा प्रताप समोर आला आहे. ज्याने उत्तरपत्रिकेत थेट चित्रपटांतील गाणीच लिहली आहेत. चंदीगड विद्यापीठातील एका विद्यार्थ्याची असल्याचा दावा केला जात आहे, या उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या एका उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने शिक्षकांना प्रभावित करण्यासाठी चक्क चित्रपटातील गाणी लिहीत त्यांचे कौतुक केले आहे. पहिल्या उत्तरात त्याने 3 इडियट्स चित्रपटातील गिव्ह मी सम सनशाईन, गिव मी सम रेन हे गाणे लिहिले आहे.

तर त्याच्या खाली त्याने शिक्षकांसाठीही एक खास संदेश लिहला आहे. तुम्ही एक अद्भुत शिक्षक आहात. मी मेहनत केली नाही ही माझी चूक आहे. प्रभु, मला टॅलेंट द्या, असे त्याने या उत्तरामध्ये म्हणले आहे. त्याखाली तिसर्‍या उत्तरात त्याने आमिर खानच्या पीके चित्रपटातील गाणे लिहिले आहे.

विद्यार्थ्याच्या पराक्रमावर शिक्षकांनीही सर्वात जबरदस्त शेरा दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी "तु आणखी उत्तरे (गाणी) लिही," असा सल्ला दिला आहे. शिक्षकांच्या या जबरदस्त शेऱ्याचे नेटकऱ्यांनीही जोरदार कौतुक केले आहे. शिष्य शेर तर गुरू सव्वाशेर अशा प्रतिक्रिया या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत...

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर cu_memes_cuians नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओला जवळपास 16 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Maharashtra News Live Update: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

Thursday Horoscope : पैशाचे व्यवहार करताना सावध राहा! ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT