Agnipath Scheme Protest In Nawada
Agnipath Scheme Protest In Nawada Twitter/@ANI
देश विदेश

Agnipath Scheme Protest: अग्निपथ योजनेला तीव्र विरोध; जमावाने भाजप कार्यालय पेटवलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिहार, नवाडा: मोदी सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) हिंसक विरोध होत असताना बिहारच्या (Bihar) नवाडामधून मोठी बातमी समोर येत आहे. अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांच्या जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला करत ते पेटवून दिले आहे. नवाडाच्या अटुआ येथील भाजप कार्यालयाला आग (Fire) लागली आहे. हजारो संतप्त आंदोलकांनी भाजपचे कार्यालय पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप (BJP) कार्यालयाच्या दोन्ही मजल्यांना आग लागली असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. भाजप कार्यालयात जाळपोळ झाल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेविरोधात भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. (Strong opposition of youth to Agneepath scheme The mob set fire to the BJP office in nawada bihar)

हे देखील पाहा -

स्थानिक प्रशासनाचे अपयश?

नवाडाच्या अटुआ येथील भाजप कार्यालयावर संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केल्याची घटना घडल्याने स्थानिक प्रशासनही हादरले आहे. माहिती मिळताच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेबाबत भाजप कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे. याला त्यांनी प्रशासकीय अपयश म्हटले आहे. स्थानिक प्रशासन सतर्क असते तर अशा घटना टाळता आल्या असत्या, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एसडीएम आणि एसडीपीओ घटनास्थळी पोहोचताच भाजप कार्यकर्ते आणखीनच खवळले. भाजपचे कार्यकर्ते या घटनेला स्थानिक प्रशासनाचे अपयश म्हणत आहेत.

हजारो तरुण हिंसक

भाजप कार्यालयाला आग लावण्याच्या घटनेने स्थानिक लोकही हैराण झाले आहेत. त्यांनी सांगितले की, हजारो विद्यार्थी आणि तरुणांनी हिंसक जमाव जमवला आणि अटुआ येथील भाजप कार्यालयाला आग लावली. भाजप कार्यालयाच्या दोन्ही मजल्यावर जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नवाडा येथे गुरुवारी सकाळपासून अग्निपथ योजनेच्या विरोधात संतप्त तरुणांचा जमाव हिंसक आंदोलन करत आहे. आंदोलक तरुणांनी पाटणा-रांची महामार्गही रोखून धरल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

गाड्या पेटवल्या, महामार्गही रोखण्यात आला

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळपासून अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गाड्या जाळण्यात आल्या असून काही ठिकाणी महामार्गही रोखण्यात आला. छपरा, आरा, सिवान या जिल्ह्यांमध्ये रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. काही प्रवासी गाड्याही पेटवण्यात आल्या. त्याचवेळी नवाडा आणि मुंगेरमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. या सगळ्यात सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT