6.0 magnitude earthquake hits Mindanao, Philippines at 4:37 AM IST – No reported damage or casualties, but fear grips locals Saam Tv News
देश विदेश

Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार हादरे, साखरझोपेत असताना जमीन हादरली, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Philippines Earthquake : फिलिपिन्सच्या मिंडानाओ भागात पहाटे ६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. अल्बानियात गेल्या ५ दिवसांत तीन भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दोन्हीकडे जीवितहानी झाली नाही, मात्र स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Namdeo Kumbhar

6.0 magnitude earthquake hits mindanao philippines early morning : साखर झोपेत असतानाच पहाटे फिलिपिन्स आणि अल्बानियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ६ रेश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. नागरिक झोपेत असतानाच अचानक जमीन हादरल्यामुळे भीतीचे वातावरण होतं. काही काळासाठी फिलिपिन्समध्ये भीतीचे वातावरण होते. या तीव्र भूकंपामुळे अद्याप कोणत्याही जिवितहानी अथवा वित्तहानीचे वृत्त नाही.

शनिवारी पहाटे फिलिपिन्सच्या मिंडानाओमध्ये ६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 4:37 वाजता हा भूकंप झाला आहे. याचे केंद्र जमिनीपासून 105 किलोमीटर खोलवर होते. राष्ट्रीय भूकंप केंद्राने (NCS) आपल्या एक्स हँडलवर याबाबतची माहिती दिली. मिंडानाओ आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुदैवाने, आतापर्यंत कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही. भूकंपाची तीव्रता पाहता स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे एक्सवरील पोस्टमध्ये एनसीएसने सांगितलेय.

फिलिपिन्स भूकंप आणि ज्वालामुखी सारख्या घटना वारंवार घडतात. कारण फिलिपिन्स हे भूगर्भीयदृष्ट्या 'रिंग ऑफ फायर' क्षेत्रात आहे. आजही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत कोणत्याही इमारतींचे नुकसान किंवा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.

अल्बानियात गेल्या पाच दिवसांपासून भूकंपाचे हादरे

दुसरीकडे, अल्बानियात गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गेल्या पाच दिवसांत तीन भूकंप झाल्याने राजधानी तिराना आणि आसपासच्या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने यात कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : हिंगोलीत शरद पवारांची राष्ट्रवादी भुईसपाट, जिल्हाध्यक्षांसह नगरसेवकांनी घड्याळ बांधलं

Maharashtra Live News Update: नागपूर रेल्वे स्टेशनवर माफियांचे आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरचे वर्चस्व, शिवसेनेचा गंभीर आरोप

Lightning Strike : चिपळूणमध्ये परतीच्या पावसाचे थैमान; वीज पडून तरुणाचा मृत्यू, ६ जण जखमी

YouTube डाऊन! व्हिडीओ पाहण्यात अडथळे, जगभरातील यूजर्स वैतागले; नेमकं काय घडलं?

Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या

SCROLL FOR NEXT