'या' तारखेला राहणार SBI ची UPI सेवा बंद
'या' तारखेला राहणार SBI ची UPI सेवा बंद  Saam Tv
देश विदेश

'या' तारखेला राहणार SBI ची UPI सेवा बंद

वृत्तसंस्था

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही सेवा आज आणि उद्या बंद राहणार आहेत. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही माहिती ग्राहकांना दिली आहे. एसबीआयने ट्विट केले की,“सिस्टम मेंटेनन्समुळे 16 आणि 17 जुलै रोजी एसबीआय बँकेच्या काही सेवा बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा यासारख्या सेवा समाविष्ट असणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीटद्वारे म्हटले आहे की 16 आणि 17 जुलै दरम्यान मध्यरात्री या सेवा बंद राहणार आहेत. ट्विटर हॅंडलवर दिलेल्या माहितीनुसार रात्री 10.45 ते रात्री 1.15 या वेळेत ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध नसतील. बँकेने याचे कारण देताना सांगितले की आपले यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करणार आहे. जेणे करून ग्राहकांना यूपीआय सेवांचा अनुभव अधिक चांगल्या पद्धतिने घेता येईल. या कालावधीत ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार पुर्णपणे बंद राहणार आहेत.

एसबीआयने कोणतीही सेवा थांबविण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वी बँकेने 3 जुलै रोजी पहाटे 3:25 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5:50 मिनिटे म्हणजेच 4 जुलै रोजी पहाटे पर्यंत सेवा पुर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. भारतात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 22 हजारापेक्षा जास्त शाखा आहेत. 31 डिसेंबर 2020 च्या आकडेवारीनुसार, इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या 8.5 कोटी झाली आहे, तर मोबाइल बँक ग्राहकांची संख्या1.9 कोटी झाली आहे. यूपीआयच्या ग्राहकांची संख्या 13.5 कोटीहून अधिक झाली आहे. बँकेद्वारे या सेवा बंद केल्यामुळे बर्‍याच ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

SCROLL FOR NEXT