Remi Enigma Dies Saam TV
देश विदेश

Remi Enigma Dies: ६८ व्या मजल्यावरुन खाली पडून प्रसिद्ध स्टंटमॅनचा मृत्यू ; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Stunt Man Falls off 68th Floor: हाँगकाँगमधील एक इमारतीवर स्टंटसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाय घसरुन तो ६८ व्या मजल्यावरुन खाली पडला.

Ruchika Jadhav

Hong kong Accident News: मोठ्या गगनचुंबी इमारतींवरुन स्टंट करणाऱ्या प्रसिद्ध फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसीडी बाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका इमारतीवर स्टंटसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाय घसरुन तो ६८ व्या मजल्यावरुन खाली पडला. खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

३० वर्षीय हा तरुण पेंटहाऊस बाहेर स्टंट करत होता. स्टंट करत असताना आपला पाय घसरत आहे असं त्याला जाणवलं. त्याने स्वत:ला सावरण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्याला स्वत:ला सावरता आलं नाही आणि तो धाडकन खाली आदळला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत एका महिलेने हा अपघात होताना पाहिल्याचं म्हटलं आहे. इमारतीत स्टंट करताना घसरल्यावर या तरुणाने स्वताला वाचवत असताना एका खिडकीला पकडण्याचा प्रयत्न केला. तेथे आतमध्ये एक महिला देखील होती. तरुणाला पाहून महिला प्रचंड घाबरली.

प्रसिद्ध स्टंट मॅनच्या (Stunt Man) निधनाने चाहत्यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. @remnigma या इंस्टाअकाउंटवर रेमीने त्याच्या स्टंटचे अनेक व्हिडिओ पोस्ट केलेत. साल २०१२ पासून तो अशा पद्धतीचे स्टंट करत होता. फोटोग्राफी हा देखील त्याचा छंद होता. अंगाचा थरकाप उडवणारे त्याचे सर्वच स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT