SRI LANKA PRISON CLASH: 23 DEAD, OVER 100 INJURED IN DEADLIEST JAIL VIOLENCE saam tv
देश विदेश

तुरुंगात कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; सुरक्षा रक्षकांसह २३ जणांचा मृत्यू, १०० जखमी, श्रीलंकेत खळबळ

Sri Lanka Jail Erupts in Violence: या हाणामारीत १०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील एखाद्या कारागृहात घडलेली ही सर्वात प्राणघातक आणि हिंसक घटना मानली जात आहे.

Bharat Jadhav

  • श्रीलंकेतील एका तुरुंगात कैद्यांमध्ये भीषण हाणामारी होऊन २३ जणांचा मृत्यू झाला.

  • मृतांमध्ये तुरुंग सुरक्षा रक्षकांचाही समावेश असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

  • जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू

श्रीलंकेतील एका तुरुंगात कैद्यांमध्ये हाणामारी झाली. यात तुरुंग सुरक्षा दलाच्या चार जणांसह २३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १०० हून अधिक लोक गंभीर जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील एखाद्या कारागृहात घडलेली ही सर्वात प्राणघातक आणि हिंसक घटना मानली जाते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही रक्तरंजित चकमक राजधानी कोलंबोच्या उत्तरेस असलेल्या नेगोम्बो शहरातील मुख्य कारागृहात घडली.

ड्रग्स तस्करांमध्ये हाणामारी

माध्यमांतील वृत्तांनुसार, रविवारी संध्याकाळी कारागृहात असलेले ड्रग्स तस्करांमध्ये वाद झाला. तस्करांच्या दोन टोळ्यांमध्ये कुठल्यातरी एका मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. रात्रभर कारागृहात मारामारी चालू असल्याचं सांगितलं जातंय. नेगोम्बो सरकारी रुग्णालयाच्या संचालिका पुष्पा गमलाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २३ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तर १०० हून अधिक जखमी कैदी आणि सुरक्षा रक्षकांवर उपचार सुरू आहेत.

धारदार शस्त्रांनी केले एकमेकांवर हल्ले

हाती आलेल्या माहितीनुसार तुरुंगात गोळीबार देखील झालाय. जखमींपैकी अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. तर इतरजणांवर धारदार शस्त्रांनी हल्ले झालेत. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्यांना वाचवण्यासाठी रुगालय प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सोमवारी सकाळीही कारागृहाच्या आतून गोळीबाराचे आवाज अधूनमधून ऐकू येत होते.

या रक्तरंजित संघर्षाची बातमी पसरताच सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. कारागृहातील महिला विभागातील महिला कैद्यांनीही गोंधळ घातला, तेव्हा परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. आपली सुटका व्हावी या मागणीसाठी त्या बराकीच्या छतावर चढल्या. याच दरम्यान छताचा काही भाग कोसळला आणि ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे काही महिला कैदी जखमी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Waterfall: पावसाळ्यात फिरायला जायचयं? मग पुण्याजवळील 'या' निसर्गरम्य धबधब्यावर करा विकेंड प्लॅन

Maharashtra News Live Update: पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा; झांजरोळीतील २०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Saswad Forts : सासवडला जाताय? मग जवळचे 'हे' ऐतिहासिक किल्ले पाहायला विसरू नका

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून चालताना काय काळजी घ्यावी? 5 महत्त्वाच्या टिप्स

Breath holding test: तुम्ही किती सेकंद श्वास रोखू शकता? जाणून घ्या तुमची फुफ्फुसं किती निरोगी आहेत

SCROLL FOR NEXT