Spicejet
Spicejet  Saam TV
देश विदेश

दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ, बॉम्ब स्क्वॉड पथकाकडून विमानाची तपासणी

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे एकच खळबळ उडाली. टेक ऑफ करण्यापूर्वीच हा फोन आला होता. यानंतर सीआयएसएफ आणि दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले.

त्यानंतर विमानतळावर विमानाची झडती घेतली. विमानामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यानंतर प्रवाशी आणि प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

बॉम्बची धमकी आलेल्या विमानाचं त्यानंतर उड्डाण झालं. विमानाची बॉम्ब स्क्वॉड पथकाने पूर्ण तपासणी केली. कोणतीही बाब संदिग्ध न आढळल्यानं विमानाचं अखेर उड्डाण करण्यात आलं. (Latest Marathi News)

धमकीचा फोन आल्यानंतर एसओपी प्रमाणे विमानाची तपासणी केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्पाइसजेटचे हे विमान सायंकाळी ५.३५ वाजता सुटणार होते. विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला तेव्हा विमानात बसलेले प्रवासी बोर्डिंग गेटवरच होते.

याआधी 9 जानेवारी रोजी मॉस्को-गोवा विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली होती. मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाचे सोमवारी रात्री ९.३० वाजता जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.

विमानात बॉम्ब असल्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली होती. त्यानंतर विमान जामनगरकडे वळवण्यात आले होते. मात्र तपासादरम्यान संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. तब्बल 9 तासांच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दुसऱ्या दिवशी गोव्याला रवाना करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

SCROLL FOR NEXT