UNGA मध्ये इम्रान खान यांचे भाषण; पुन्हा काश्मीरचा मुद्दा केला उपस्थीत Saam Tv
देश विदेश

UNGA मध्ये इम्रान खान यांचे भाषण; पुन्हा काश्मीरचा मुद्दा केला उपस्थीत

पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या UNGA च्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या UNGA च्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानला भारतासोबत शांतता हवी आहे, असे सांगत इम्रान खान म्हणाले की, दक्षिण आशियात कायमस्वरूपी शांतता जम्मू -काश्मीर वादाच्या निराकरणावर अवलंबून आहे. अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारतावर आहे. असे इम्रान खान यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे.

हे देखील पहा-

इम्रान खान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तान या युद्धग्रस्त देशात सध्याच्या सरकारला बळकट आणि स्थिर केले पाहिजे. म्हणजे तालिबान राजवटिला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला हिंदू राष्ट्रवादी 'फॅसिस्ट' म्हटले गेले. इम्रान खान म्हणाले की, अमेरिकेतच्या हल्ल्यानंतर उजव्या विंगने मुस्लिमांवर हल्ले सुरू केले. त्याचा सर्वात मोठा परिणाम भारतात झाला आहे.

इम्रान यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधत म्हटले की, ते मुस्लिमांशी भेदभाव करतात. त्याचबरोबर भारताने काश्मीरवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या मृत्यूचाही उल्लेख करण्यात आला आहे. गिलानी यांच्या कुटुंबीयांवर अन्याय झाल्याचे सांगितले आहे.

इम्रान खान म्हणाले की, गिलानीच्या कुटुंबाने म्हटले आहे की, भारतीय अधिकाऱ्यांनी गिलानी यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याच्या संमतीशिवाय त्याला दफन केले. तर गिलानी याना  योग्य इस्लामिक पद्धतीने दफन करण्यास नकार दिला. गिलानी यांच्या कुटुंबाला इस्लामिक पद्धतीने त्यांचे अंतिम संस्कार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; कर्जमुक्ती योजनेतील पहिली मोठी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT