पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी
सातारा : महाराष्ट्र शासनाने सातारा या ठिकाणी मंजूर केलेल्या जागेची पहाणी सहकार आणि पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार आदी उपस्थित होते.
हे देखील पहा-
साताऱ्यातील कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या जागेवर हे महाविद्यालय उभे राहणार असून, या बाबत आता मंजुरी आणि इतर तांत्रिक बाबजनची पूर्तता झाली असून तात्पुरत्या स्वरूपात यावर्षी इतर खासगी महाविद्यालयात या बाबतची प्रवेश प्रक्रिया करण्याचा विचार सुरू आहे. या जागेची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्री श्री.बाळासाहेब पाटील म्हणाले की, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणार आहे. सध्या शासकीय महाविद्यालय खासगी महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आले आहे. पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा मानस असून, शासकीय महाविद्यालयाची इमारत काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी महाविद्यालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.