Special Session of Parliament  SAAM TV
देश विदेश

Special Session of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन; कधीपासून आणि काय होणार नेमकं?

Parliament special session from 18 to 22 September : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

Nandkumar Joshi

Special Session of Parliament News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. यात पाच बैठका होतील, अशी माहिती आहे. १७ व्या लोकसभेचं १३ वे अधिवेशन आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन आहे. या विशेष अधिवेशनात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. (National News)

संविधानातील अनुच्छेद ८५ (कलम ८५) मध्ये संसदेचे अधिवेशन घेण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत सरकारला संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे. संसदेच्या कामकाजासंदर्भातील कॅबिनेट समिती याबाबत निर्णय घेते. त्याला राष्ट्रपतींद्वारे औपचारिक स्वरूप दिले जाते. त्या माध्यमातून लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना अर्थात खासदारांना अधिवेशनाला बोलावलं जातं.

पावसाळी अधिवेशनात झाला होता गदारोळ

तत्पूर्वी, २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत संसदेचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्यात मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं, यावर विरोधक आग्रही होते. तर सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मुद्यावर उत्तर देतील यावर सरकार ठाम होते. संसदेत या मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास तयार आहे, असे सांगण्यात आले. मात्र, यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती.

सरकारविरोधात अविश्वास ठराव

काँग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदींनीही जोरदार उत्तर दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT