Parliament Special Session Saam Tv
देश विदेश

Parliament Special Session: विशेष अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षांना अजेंडा सांगणार केंद्र सरकार? बोलावली सर्वपक्षीय बैठक

Modi Government: विशेष अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षांना अजेंडा सांगणार केंद्र सरकार? बोलावली सर्वपक्षीय बैठक

Satish Kengar

Parliament Special Session:

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधी सरकार अजेंडा जाहीर करण्याची शक्यता आहे.

संसदेचे पाच दिवसांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अजेंडा जाहीर न केल्याबद्दल विरोधक सातत्याने सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी १७ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याचे वृत्त आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. या अधिवेशनात सरकार 'एक देश एक निवडणूक', महिला आरक्षण, घटना दुरुस्तीसह अनेक मोठी विधेयके आणू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी यासंदर्भातील माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. (Latest Marathi News)

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याची माहिती नसल्याबद्दल काँग्रेसने बुधवारी पुन्हा एकदा सरकारला प्रश्न विचारला आहे. याबद्दल ट्वीट करत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, 'आज १३ सप्टेंबर आहे. संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन पाच दिवसांनंतर सुरू होणार आहे आणि एका व्यक्तीशिवाय (कदाचित दुसर्‍या) अजेंड्याची माहिती नसेल. पूर्वीच्या प्रत्येक प्रसंगी, जेव्हा जेव्हा विशेष सत्रे किंवा विशेष बैठका आयोजित केल्या जात होत्या, तेव्हा अजेंड्याची आधीच माहिती असायची.'

याआधी काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांनी अदानी प्रकरणातील जेपीसी तपास, वाढत्या किमती, रोजगार इत्यादी सुमारे ९ मुद्दे उपस्थित केले होते. मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT