Special Railway Trains Saam Tv
देश विदेश

Special Railway Trains: ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त १३८ स्पेशल ट्रेन, ६५० फेऱ्या; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

Railway to run 650 Additional Train for Christmas and New Year: रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमसनमित्त डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात १३८ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे.

Siddhi Hande

ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त १३८ अतिरिक्त ट्रेन सोडणार

६५० रेल्वे फेऱ्या घेण्यात येणार

प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक सुट्ट्या आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. यामुळे त्या कालावधीत अनेकजण आपापल्या घरी किंवा फिरायला जातील. दरम्यान, ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्तच्या या सुट्ट्यांच्या कालावधी १३८ अतिरिक्त ट्रेन धावणार आहे. संपूर्ण देशात या ट्रेन सोडल्या जाणार आहे.

प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर आणि जलद व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक नवीन वर्ष साजरा करण्यासाठी फिरायला जायचा प्लान करतात तर अनेकजण आपापल्या घरी जातात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

१३८ अतिरिक्त ट्रेन सोडणार

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यांनुसार, १३८ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. यामुळे ६५० जास्त फेऱ्या होणार आहे. यामधील २४४ फेऱ्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. या स्पेशल ट्रेन नऊ रेल्वे झोनमधून सोडल्या जाणार आहे. प्रवाशांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये प्रत्येक झोननुसार ट्रेनच्या फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहे. वेस्टर्न रेल्वेतून २६ स्पेशल ट्रेन आणि २२६ फेऱ्यांना मान्यता दिली आहे. सेंट्रल रेल्वेद्वारे १८ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. या ट्रेन ११८ फेऱ्या करतील. साउथ सेंट्रल रेल्वेने २६ ट्रेनला मान्यता दिली असून या ट्रेन ३४ फेऱ्या मारणार आहेत. साउथ इस्टर्न सेंट्रल रेल्वे १२ ट्रेन सोडणार आहेत. या ट्रेनद्वारे ८२ फेऱ्या घेण्यात येणार आहे. यामधील अनेक ट्रेनची माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

Maharashtra : नांदेडमध्ये १५०० मतदारांना डांबून ठेवले, भाजप आमदारावर आरोप, राज्यात कुठे काय झालं?

Brain Cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापुर्वी डोकंच नाही तर ही गंभीर लक्षणं दिसतात, या समस्यांना दुर्लक्षित करणं आत्ताच टाळा

SCROLL FOR NEXT