tamil nadu latest news  Saam tv
देश विदेश

३७ लाख नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी ₹ २००० जमा होणार; विशेष पॅकेजची घोषणा, काय आहेत अटी?

tamil nadu latest news : तामिळनाडूतील ३७ लाख नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी ₹ २००० जमा होणार आहे. स्टॅलिन सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली आहे.

Saam Tv

तामिळनाडू सरकारकडून ३७ लाख नागरिकांसाठी दरमहा २००० रुपयांची मदत होणार

महिलांसाठी विशेष पॅकेज घोषणा

वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि तृतीयपंथी घटकांचा योजनेत समावेश करण्यात आलाय

तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीआधी एमके स्टॅलिन सरकारने मोठी घोषणा केली आहे. मागासवर्गीय, वंचित घटकातील नागरिकांच्या खात्यात मासिक २००० रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. या योजनेसाठी मागासवर्गीय, वृद्ध, विधवा, तृतीयपंथी आणि दिव्यांगांचा समावेश आहे. कलाइग्नार मगलीर उरिमाई थिट्टम योजनेचा विस्तार आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सुरुवातीला ही योजना महिलांसाठी जाहीर करण्यात आली होती.

सरकारने म्हटलं आहे की, सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत २९ लाखांहून अधिक वृद्ध आणि विधवांना ३२०० आणि ५ लाखांहून दिव्यांगाना ३५०० रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ३ लाख दिव्यांग व्यक्तींना ४०० रुपये रक्कम देण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी म्हटलं की, 'समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटनकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात महिलांना प्रत्येकी २००० रुपये देण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली. एम के स्ल्टॅलिन यांनी १३ फेब्रुवारी रोजी घोषणा केली होती. त्यानुसार, १.३१ लाख महिला लाभार्थींच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली होती.

स्टॅलिन यांनी पुढे म्हटलं की, 'आम्ही लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. मार्च महिन्यात पेन्शनसहित २ हजार रुपये अतिरिक्त महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. तर जून महिन्यात मच्छिमारांना ८००० रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली. ही आर्थिक मदतीचा फायदा थेट १ लाख ६२ हजार लाभार्थ्यांना होणार आहे. या आर्थिक मदतीमुळे मच्छिमारांच्या कुटुंबांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसेचा मेळावा; राज ठाकरे DJवर बोलणार?

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच HRA मध्येही मोठा बदल

Bread-Omelette : नाश्त्यात रोज ब्रेड-ऑम्लेट खाणं आरोग्यासाठी चांगलं की धोकादायक? आताच जाणून घ्या

Birthday Gift for Girlfriend: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला द्या सरप्राईज गिफ्ट; 'ती' होईल खुपच खूश

Palghar : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा, पालघरमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण भोवलं

SCROLL FOR NEXT