Spain train accident today Saam TV Marathi
देश विदेश

भयंकर! २ हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक, २१ प्रवाशांचा मृत्यू, ३० जणांची प्रकृती गंभीर

High speed train crash Spain : स्पेनमधील कॉर्डोबाजवळ दोन हायस्पीड ट्रेनची भीषण धडक होऊन २१ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील ३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून रेल्वे सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.

Namdeo Kumbhar

High speed train crash Spain : स्पेनमध्ये २ हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना झाली. या अपघातामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी आहेत. रविवारी दक्षिण स्पेनमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देश हादरला. कॉर्डोबा शहराजवळील अदमुझ परिसरात २ हाय-स्पीड ट्रेनची धडक झाली. मालागाहून माद्रिदला जाणारी हायस्पीड ट्रेन रुळावरून घसरून दुसऱ्या मार्गावर आदलळी. त्याचवेळी माद्रिदहून हुएल्वाला जाणारी दुसरी ट्रेनने या ट्रेनला जोरात धडक दिली.

या अपघातामध्ये आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. या अपघातामध्ये ७० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये ३० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप बचावकार्य सुरू असल्याने मृताची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. स्पेनचे वाहतूक मंत्री ऑस्कर पुएंटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अपघातामधील ३० जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, मालगा येथून ट्रेन निघाल्यानंतर फक्त १० मिनिटांतच हा अपघात झाला. धक्कादायक म्हणजे ट्रेन ज्या रुळावरून घसरली त्याचे मे २०२५ मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते. स्पेनच्या वाहतूक मंत्र्यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे. जखमींना तात्काळ मदत करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा अपघात नेमका कसा झाला, याचं कारण काय? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

खासगी आणि सरकारी ट्रेन धडकल्या

आयरियो कंपनीमार्फत चालवली जात असलेल्या अपघातग्रस्त मालागा ते माद्रिद या ट्रेनमध्ये जवळपास ३०० प्रवासी होते. तर सरकारी कंपनी रेन्फेकडून चालवली जात असलेल्या दुसऱ्या ट्रेनमध्ये १०० प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर रेल्वेचे डब्बे रूळावरून खाली घसरले. दोन्ही हायस्पीड ट्रेनच्या भयंकर धडकेने देश हादरलाय. दरम्यान, या अपघातानंतर माद्रिद आणि अंडालुसिया दरम्यानच्या रेल्वे सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अपघातग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबांसाठी आपत्कालीन मदत आणि समुपदेशन सेवा सुरू केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयानक! बियरच्या बाटलीत लघवी भरली अन् सोनूला पाजली, टॉर्चरचा व्हिडिओ कुटुंबाला पाठवला

Winter Diet: वजन कमी करायचंय? मग नाश्त्यात हा १ पदार्थ खा, दिवसभर पोट भरलेलं राहील

The Bhabiji Ghar Par Hain movie : चित्रपटाच्या सेटवर भयंकर अपघात; 500 किलोचे झाड कोसळले, मुख्य कलाकारांचा जीव थोडक्यात बचावला, वाचा थरारक प्रसंग

Maharashtra Live News Update: अजित पवार घेणार पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची बैठक

LIC Policy: LIC ची जबरदस्त योजना! महिन्याला फक्त ४४०० रुपयांचा प्रिमियम, मॅच्युरिटीवर मिळणार १६ लाख

SCROLL FOR NEXT