Spain Power Outage saamtv
देश विदेश

Spain Power Outage: युरोपची बत्ती गूल; फ्रान्स,स्पेनसह अनेक देशात ब्लॅकआऊट, विमान उड्डाणासह मेट्रोला ब्रेक

Power Outage in Spain: स्पेनमध्ये पावर ग्रीडमध्ये समस्या झाल्यानंतर संपूर्ण देशातील वीज पुरवठा खंडीत झालाय. स्पेनच्या या समस्येचा प्रभाव फ्रान्स आणि पोर्तुगालमधील अनेक भागात झाला.

Bharat Jadhav

स्पेनच्या पावर ग्रीडमधून होणाऱ्या वीज पुरवठ्यात कपात करण्यात आल्याने संपूर्ण देशाची बत्ती गूल झालीय. स्पेनसह फ्रान्स आणि पोर्तुगालमध्ये वीज पुरवठा खंडीत झालाय. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्पेन पावर ग्री ऑपरेटर कंपनी रेड इलेक्ट्रॉनिक्सने सांगितलं की, ऊर्जा कंपन्यांच्या मदतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

स्पेनमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर ई-रीड्स, एक स्पॅनिश वीज ग्रिड मॉनिटरिंग कंपनीने सांगितलं की, संपूर्ण देशात योग्य आणि नियमितपद्धतीने वीजेचा पुरवठा करण्यात यावा यासाठी प्रयत्न केला जाईल. ही संपूण युरोप देशाची समस्या असल्याचंही कंपनीने सांगितलंय.

रस्त्यावर लोकांची गर्दी

स्पॅनिश रेडिओ स्टेशन्सनी सांगितले की माद्रिदमधील भूमिगत रस्ते रिकामे करण्यात आलेत. कॅडोर सेर रेडिओ स्टेशनने सांगितलं की, स्पेनची राजधानी माद्रिद शहराच्या मध्यभागी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रस्त्यांवर गोंधळ उडाला होता. रस्त्यांवरील लाइट्स बंद झालेत. अशा परिस्थितीत देशाच्या राजधानीतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. तर पोर्तुगाल पोलिसांनी यासंबंधी सांगितलं की, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे देशभरातील रस्त्यावरील लाइट्स बंद झालेत. याशिवाय लिस्बन आणि पोर्तोमध्ये मेट्रो सेवा देखील बंद करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

India vs New Zealand T20: भारताचा टी२० मालिकेत धमाकेदार विजय, इशान आणि अर्शदीप ठरले स्टार, न्यूझीलंडला ४-१ने लोळवलं

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT