Elon Musk  Saam Tv
देश विदेश

Elon Musk Mars Mission : एलन मस्कचं मिशन मंगळ! २० वर्षात शहर स्थापन करायचं; नेमका काय आहे प्लॅन?

Elon Musk Mars Mission Target To Establish City on Mars : स्पेस X चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांचे स्वप्न आहे की, येत्या २० वर्षांत मंगळ ग्रहावर एक स्वयंपूर्ण शहर स्थापन करावे. यासाठी कंपनी सतत संशोधन करत आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : मंगळ ग्रहावर एक स्वयंपूर्ण शहर निर्माण करावं, असं रॉकेट निर्मिती कंपनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांचं स्वप्न आहे. येत्या २० वर्षांमध्ये मंगळ ग्रहावर एक स्वयंपूर्ण शहर वसवलं जाणार आहे, यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत असल्याची माहिती मिळतेय. एलन मस्कचं मिशन मंगळ नेमकं काय आहे, काय प्लॅन आहे? ते सविस्तर जाणून घेवू या.

मंगळ ग्रहावर शहर स्थापन करायचं

मंगळ मोहिमेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, याबद्दल एलन मस्क पहिल्यांदाच बोलले आहेत. मस्क म्हणाले की, येत्या २० वर्षात एका सामान्य शहराप्रमाणे मंगळ ग्रहावर देखील शहराची स्थापना करायची, हे त्यांचं ध्येय (Elon Musk Mar Mission) आहे. यासाठी तंत्रज्ञानात दहा हजार पट सुधारणा करणं आवश्यक आहे. हे खूप अवघड असेल पण अशक्य नाही, असं मस्क म्हणाले आहेत. यासोबतच त्यांनी X प्लॅटफॉर्म आणखी विकसित करण्याबाबत माहिती दिलीय. जेणेकरून वापरकर्त्यांना अधिक फायदा मिळू शकेल.

मंगळ ग्रहावर लँडिंगची चाचणी

एलन मस्क यांनी दावा केलाय की, मंगळ ग्रहावर जाणारी पहिली स्टारशिप येत्या दोन वर्षांत लॉन्च केली जाणार आहे. पुढील पृथ्वी मंगळ ट्रान्सफर विंडो उघडेल, तेव्हा ही स्टारशीप लॉन्च केली (City on Mars) जाईल. मंगळ ग्रहावर लँडिंगची चाचणी घेण्यासाठी त्यांना क्रूमध्ये समाविष्ट केलं जाणार नाही. हे लँडिंग यशस्वी झाल्यास ४ वर्षात मंगळ ग्रहावर पहिलं क्रू उड्डाण केलं जाईल, अशी माहिती मस्क यांनी दिलीय.

एलन मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटलंय की, मंगळ ग्रहावरील जीवन व्यावहारिक बनवण्यासाठी प्रति टन पेलोडची किंमत एक अब्ज डॉलर्सवरून एक लाख डॉलरपर्यंत कमी करणं आवश्यक आहे. ते लक्ष्य खूप आव्हानात्मक आहे, पण ते असाध्य नसल्याचं मस्क यांनी म्हटलंय.

मंगळ ग्रहाची निवड का केली?

मंगळ ग्रह (Mars Mission) पृथ्वीपासून सुमारे १४० दशलक्ष मैल दूर आहे. तो इतर दुसऱ्या कोणत्याही ग्रहाच्या सर्वात जवळ आहे. मंगळ ग्रह पृथ्वी आणि सुर्यापासून ५० टक्के दूर आहे, तरी सूर्यप्रकाश अजूनही येथे पोहोचतो. मंगळ ग्रहावर थोडी थंडी देखील आहे. पण त्यासाठी काही व्यवस्था करता येईल, म्हणून मंगळ ग्रहाची निवड केल्याचं मस्क (Elon Musk) यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT